बीज राखी 
महाराष्ट्र बातम्या

बियांपासून राखी! कोल्हापूरच्या वर्षा-अभिजित यांची कमाल

कोल्हापूराच आता क्रेझ बीजराखेची

अर्चना बनगे

कोल्हापूर: गेल्या काही वर्षात पारंपरिक राखी बरोबर आधुनिक तसेच तंत्र कौशल्याचा वापर करून मनोहरी राख्या बनवल्या जात आहेत. त्याचा अधिक आत्मीयतेने वापर सुद्धा केला जात आहे. मात्र यंदा काही कल्पक भगिनींनी निसर्ग पूरक राख्या तयार केल्या असून या राख्यांना भाजीपाल्यापासून वनौषधी झाडे यांच्या बिया वापरल्या आहेत. अशा बियांपासून बनवलेल्या सुंदर सुबक राख्या रक्षाबंधनाला निसर्गाशी बंधुत्वाचे नाते अधिक दृढ करणार आहेत.

कोल्हापुरात बीचराखी सोबत रक्षाबंधन साजरे करूया, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावूया

भाऊ बहिणीच्या रक्ताच्या जोडलेल्या आपुलकीचे नातं भक्कम करणारे प्रतिक म्हणजे रक्षाबंधन. असंख्य सुबक आकर्षक तितक्याच मनोहरी राख्यांनी रक्षाबंधनाचा सोहळा दरवर्षी संपन्न होत गेला. त्यासोबतच कलात्मकता, कल्पकता व सौंदर्य अशा गुणवैशिष्टे यांनी सजलेल्या राख्या अनेक बहिणीने भावांना बांधल्या . अनेक जण आपल्या बुद्धी कौशल्याला ताण देऊन विविध गुणवैशिष्ट्ये सजलेल्या राख्या तयार करतात. त्या आकर्षक तितक्याच टिकाऊ असतातच. मात्र कोल्हापुरातून बीचराखी सोबत रक्षाबंधन साजरे करूया, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावूया हे ब्रीदवाक्य घेऊन गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूरच्या सदस्या वर्षा वायचळ आणि वर्ल्ड फॉर नेचर कोल्हापूरचे जिल्हाअध्यक्ष अभिजीत वाघमोडे यांनी यंदा पर्यावरणपूरक तसेच निसर्गाच्या समृद्धतेची वाट दाखवणार्या देशी वाणांच्या राख्या बनवल्या आहेत. यांना लक्ष्मी मिसळचे अमोल गुरव यांचे सहकार्य लाभले आहे.

असे आहेत बीज

या राख्यांना भाजीपाल्यापासून वेगवेगळ्या जंगली फळांपर्यंतच्या बिया जोडल्या आहेत. त्याला रंगरंगोटी सजावट केली आहे. याला धाग्यांमध्ये गुंफले आहेत. त्यामुळे रक्षाबंधना नंतर या राखीच्या असलेल्या बिया एखाद्या कुंडीत अथवा मातीत पेरल्यानंतर त्याला सतत पाणी घातल्यास बीजांकुरण होईल व भाजीपाला फळांची नवी रोपे तयार होतील. यातून निसर्ग संवर्धना बरोबरच सेंद्रिय भाजीपाल्याचा आस्वाद घेत आपलं आयुष्य अधिक तंदुरुस्त बनवता येईल. तसेच काही दुर्मिळ झाडांना जीवदान मिळून निसर्ग संवर्धनाचे आणखीन एक सक्षम पाऊल पुढे पडेल त्यासोबत निसर्ग पूरक रक्षा बंधनाचा धागा अधिक बळकट होईल.

अशी आहे बीजराखी

अशी आहे राखी

या राखीमध्ये सुती धागा, करंज, बकुळ, चिंच, लाल भोपळा, सीताफळ, टेंभुर्णी ,रतनगुंज, काटेसावर, बहावा, भाकर अशा देशी बियांचा वापर करण्यात आला आहे.

वर्षा वायचळ, गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूरच्या सदस्या

ही राखी पर्यावरण पूरक असणार आहे. ज्यामध्ये प्लास्टिकचा कोठेही वापर केलेला नाही. हि राखी घरीही बनवता येते. यासाठी एक किट दिले जाणार आहे. ज्यामध्ये विविध देशी झाडांच्या बिया, आणि सुती धागा असेल ज्याचा वापर करून तुम्ही ही राखी घरी बनवू शकता. शिवाय हे कीट मोफत असणार आहे.

वर्षा वायचळ, गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूरच्या सदस्या

अभिजीत वाघमोडे , वर्ल्ड फॉर नेचर कोल्हापूरचे जिल्हाअध्यक्ष

बीज संकलन आणि बीजरोपण होऊन पर्यावरणाचे संवर्धन करणे हा आमचा उद्देश आहे. शिवाय देशी वाण टिकऊन ठेवावे यासाठी वर्ल्ड फॉर नेचरच्या सदस्यांचे सहकार्य ही आम्हाला मिळाले.

अभिजीत वाघमोडे , वर्ल्ड फॉर नेचर कोल्हापूरचे जिल्हाअध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT