Ram Kulkarni Reaction on Amol Mitkari Esakal
महाराष्ट्र बातम्या

अमोल मिटकरांनी राजकारण सोडून चित्रपटात जावं; राम कुलकर्णी

अमोल मिटकरी यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता.

सकाळ डिजिटल टीम

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केल्यानंतर पवार साहेब आपल्याला मोठं करतील. अशी आशा ठेवून त्यांच्यावर टीका केली जात असल्याचा आरोप भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यावर केला. मिटकरींनी राजकारण सोडून चित्रपटात जावं असा सल्लाही त्यांनी दिला.

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर पवार साहेब आपल्याला मोठं करतील.

देवेंद्र फडणवीस यांनी १४ एप्रिल रोजी १४ ट्विट करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. यावरून अमोल मिटकरी यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्याला भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाले अमोल मिटकरी

१४ एप्रिल दिवशी १४ ट्विट करून बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार असल्याचा केविलवाणा प्रयत्न आरएसएस करत आहे. फडणवीसांनी यातून मुस्लिम द्वेश दाखवला आहे. या देशात मुस्लिम नकोत अस त्यांच मत आहे. मात्र बाबासाहेबांनी संविधानात समतेचा अधिकार सर्वांना दिला आहे.बाबासाहेबांचे संविधान नको असणारे लोक बालिश ट्विट करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.भारताची राज्यघटना स्वातंत्र, समता, बंधुता आणि न्याय या चार मुल्यावर आधारित आहे. मात्र फडणवीस याच्याविरोधात बोलत आहेत असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Municipal Election : निवडणूक प्रक्रियेवर नाराजी! चक्क उमेदवार मतदारांना सांगतोय, 'मला मतदान करू नका'; असं का करताहेत घोडके?

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला

Kolhapur Politics : गावोगावचे रस्ते-पाणी-शाळांचे खरे प्रश्न गायब; जिल्हा परिषद निवडणुकीत ‘राज्य-देश पातळीचा प्रचार’च का ठरतोय केंद्रस्थानी?

Overthinking: ओव्हरथिंकिंगचा कंटाळा आला? जपानी लोकांच्या ‘या’ खास पद्धती नक्की वापरून बघा!

AI Video Apps : AI ने बनवलेले व्हिडिओ नेमके ओळखायचे कसे? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT