Sculptor Ram Sutar receiving the Maharashtra Bhushan Award 2024 for his lifelong contribution to monumental Indian sculpture.
esakal
Ram Sutar Maharashtra Bhushan 2024, : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण 2024' पुरस्कार प्रदान केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री ॲड. आशिष शेलार उपस्थित होते.
राम सुतार यांचा सन्मान हा महाराष्ट्राचा सन्मान आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच, राम सुतार यांचे कार्य नवीन पिढीला प्रेरणादायी आहे असंही फडणवीसांनी बोलून दाखवलं.
तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन मला मोठा सन्मान महाराष्ट्राने दिला आह. हा पुरस्कार माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि सर्वोच पुरस्कार आहे. अशी प्रतिक्रिया राम सुतार यांच्याकडून आली आहे.
तर शिल्पकलेसारख्या काहीशा अवघड कलेला आपल्या परिसस्पर्शाने नवीन आयाम मिळवून दिलेल्या सुतार यांचे या क्षेत्रातील योगदान निव्वळ अतुलनीय आहे. आपल्या शिल्पकलेने देशातील अनेक दिग्गज नेते, महापुरुष तसेच अनेक प्रभृतींची शिल्पे त्यांनी घडवली. आजवरच्या मूर्तिकलेतून साकारलेल्या शिल्पकृतींमधून त्यांचे कार्य आगामी पिढ्यांसाठीही मार्गदर्शक ठरेल असे मत याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. त्यांना देण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने या पुरस्काराचे भूषण वाढले असल्याचेही यावेळी शिंदे यांनी नमूद केले.
राम सुतार यांनी आपल्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी आदींच्या पाषाणातील कलाकृती आपल्या कौशल्यातून साकारलेल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.