Ramdas Athavle
Ramdas Athavle Team eSakal
महाराष्ट्र

शिवसेनेने दसरा मेळाव्यापूर्वी भाजपसोबत यावं: रामदास आठवले

सुधीर काकडे

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षांत मोठी चिखलफेक सुरु असल्याचे पाहायला मिळते. भाजपनेते किरिट सोमय्या यांनी केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपामुळे राजकीय वातावर चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील यावर आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राहणं शिवसेनेसाठी नुकसानकारक आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने राज्याच्या विकासासाठी सोबत यावं असे विधान रामदास आठवले यांनी केले आहे.

शिवसेने राष्ट्रवादी आणि काँग्रसची साथ सोडून अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला स्विकारुन भाजप सोबत यावं आणि राज्याचा विकास करावा. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास केंद्राकडून निधी आणता येईल असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत अंतर्गत वाद असल्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जाता आहेत, त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातील दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेने भाजप सोबत यावे असेही पुढे रामदास आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेना नेते आनंद गीते यांनी राष्ट्रवादी बद्दल केलेल्या वक्तव्यावर देखील त्यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. यावेळी रामदास आठवले म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सन्माननीय आहेत, ते कोण्या एका पक्षाचे नेते नसून महाराष्ट्राचे नेते आहेत. शरद पवारांनी काँग्रेस सोडली नव्हती तर त्यांना काँग्रेसमधून बाहेर काढलं होतं.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर जर एवढे गंभीर आरोप करायचे आहेत, तर शिवसेनेने राष्ट्रवादी सोबत राहूच नये, त्यांनी पुन्हा भाजप सोबत आलं पाहिजे, शिवसेनेने भाजप आणि आरपीआय सोबत येऊन बाळासाहेब ठाकरे यांचं शिवशक्ती आणि भिमशक्तीचं स्वप्न साकार करायला पाहिजे अशा भावना रामदास आठवले यांनी व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT