Ramdas Athawale
Ramdas Athawale  Sakal
महाराष्ट्र

Ramdas Athawale : 'ठाकरे-आंबेडकर युतीला शिवशक्ती-भीमशक्ती म्हणता येणार नाही'

सकाळ डिजिटल टीम

Ramdas Athawale On Thackeray Ambedkar Alliance : नुकतीच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी युतीची घोषणा केली आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर असताना या युतीची घोषणा झाल्याने याला महत्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा - 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

दरम्यान, या युतीवर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी भाष्य केले आहे. ठाकरे आणि आंबेडकरांच्या युतीला शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आली असे म्हणता येणार नसल्याचे ते म्हणाले.

कारण, बाळासाहेब ठाकरे असतांना शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आली होती आणि महायुती उदयास आली होती असे ते म्हणाले.

खरी भीमशक्ती नरेंद्र मोदींसोबत असून, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची युती ही उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचितची युती म्हणता येईल. मात्र, या युतीला शिवशक्ती-भीमशक्ती म्हणता येणार नसल्याचे ते म्हणाले.

सध्या विरोधकांकडून दिशाभूल सुरू असून याचा काडीमात्र उपयोग होणार नाही, असे आठवले म्हणाले. यावेळी त्यांनी कसबा आणि चिंचवडमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीवरही भाष्य केले.

ते म्हणाले की, कसबा आणि चिंचवड पोट निवडून बिनविरोध व्हावी ही इच्छा आहे. याला विरोधकांनी पाठिंबा द्यावा हीच दिवंगत आमदारांना आदरांजली असेल असे ते म्हणाले. निवडणुका झाल्या तर आरपीआयचा भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा असेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले

आमचं नाव घेतलं पाहिजे

यावेळी त्यांनी भाजपने आरपीआयला डावलू नये असे म्हणत भाजप आणि शिंदेंची युती झाली. भाजपच्या नेत्यांकडून शिंदे गटाचे नाव घेतले जाते. मात्र, आधीपासून सोबत असणाऱ्या आरपीआयचे नाव घेतले जात नाही.

आमच्या सहभागामुळे महायुती तयार झाली होती याची आठवण करून देत. बोलताना आमचेही नाव घ्यावे अशी इच्छा व्यक्त केली. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

पठान आता विरोध करण योग्य नाही

यावेळी आठवलेंनी आज प्रदर्शित झालेल्या पठान चित्रपटावरही भाष्य केले. ते म्हणाले की, आज प्रदर्शित झालेल्या पठान चित्रपटाला बजरंग दलाने विरोध दर्शवला आहे.

या चित्रपटातील गाण्यात भगव्या रंगाला बेशरम रंग असे म्हटले होते. परंतु सेन्सॉरने तो रंग हटवला आहे. यामुळे आता याला विरोध करण्याच काही कारण नाही.

कोश्यारींबाबत मोदी निर्णय घेतील

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी नुकतीच पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.

कोश्यारींनी राज्यातून जावं असं विरोधकांना वाटते. आम्हाला तसे वाटत नाही. पद सोडण्याची इच्छा त्यांनी स्वतःहून व्यक्त केली आहे. याबाबत पंतप्रधान योग्य निर्णय घेतील असे आठवले म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT