ramdas athawale on raj thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

मशिदींवरील भोंगे काढल्यास विरोध करणार; आठवलेंचा इशारा

'राज ठाकरे यांना जर मंदिरांवर भोंगे लावायचे असतील तर ते लावू शकतात.'

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : महाराष्ट्रात भोंग्यावरुन राजकारण तापले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. ठाण्यात पार पडलेल्या उत्तरसभेत त्यांनी ३ मे ही शेवटची तारिख मशिदींवरील भोंगे काढण्यास असल्याचे सांगितले. मात्र यावरुन राज्यात टीका-टिप्पणी होत आहे. यात केंद्रीयमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उडी घेतली आहे. नवरात्र आणि इतर उत्सवाप्रसंगी भोंगे लावल्यास चालते. (Ramdas Athawale Oppose Raj Thackeray's Politics Of Mosque Loudspeakers)

मशिदींवरील भोंगे काढण्याचे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. राज ठाकरे यांना जर मंदिरांवर भोंगे लावायचे असतील तर ते लावू शकतात. मात्र मशिदींवरील भोंगे काढल्यास त्याला रिपब्लिकन पक्ष विरोध करेल, असा इशारा आठवले यांनी दिला. ते नागपूर (Nagpur) येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्रात भोंग्यावरुन राजकारण होऊ नये. अनेक वर्षांपासून मशिदींवर भोंगे आहेत. भोंग्यांचे काय करायचे यावर मुस्लिम समाज विचार करु शकतो. मात्र मला वाटते की एका धर्माच्या लोकांनी दुसऱ्या धर्माचा आदर करायला हवा, असे रामदास आठवले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

Mumbai News : चार महिने झाले... आई अजूनही दाराकडे पाहतेय; ‘अब्दुल’ कुठे आहे?

Latest Marathi News Live Update : स्वातंत्र्यदिनानिमित्त बीबी का मकबऱ्याला मनमोहक तिरंगी रोषणाई

Stray Dogs : भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर! ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र ‘डॉग शेल्टर’ उभारा

Shirur Market Committee Election : शिरूर बाजार समितीची निवडणूक तात्काळ घ्या; काँग्रेस पक्षाची मागणी

SCROLL FOR NEXT