Ramdas Athawale sakal
महाराष्ट्र बातम्या

'शिवसेना आघाडीतून बाहेर पडेल अन् भाजपासोबत राज्यात सत्तेत येईल'

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार लवकरच जाईल; मंत्री नारायण राणे यांच्या विधानाला दुजोरा

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार लवकरच जाईल; मंत्री नारायण राणे यांच्या विधानाला दुजोरा

सांगली : पुढच्या वर्षी शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल आणि भाजपासोबत राज्यात सत्तेत येईल, असे भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विधानाला दुजोरा देत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार लवकरच जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सांगली दौऱ्यावर आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मार्चमध्ये महा विकास आघाडीचे सरकार जाईल असे विधान केले होते यावर बोलतना मंत्री आठवले म्हणाले, शिवसेना आणि भाजपा या आधी सत्तेत एकत्र होती. आता शिवसेना महविकास आघाडीमध्ये आहे. मात्र या सरकारमध्ये अनेक विषयांवरून प्रवाद आहेत. अनेकांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे असे माझे आवाहन आहे. लवकरच शिवसेना आघाडीतून बाहेर पडेल. त्यानंतर भाजपा सोबत शिवसेना येऊन राज्यात नवी सत्ता येऊ शकते. पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये राज्यात नवी सत्ता येऊ शकते, त्यामुळे नारायण राणे यांचे जे विधान आहे, ते बरोबर असू शकते.

ते म्हणाले, आतापर्यंत केंद्र सरकारच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे, भविष्यातही अशीच काळजी घेतली जाईल असे ते म्हणाले. गेल्या वेळी गो कोरोना गो असे म्हटल्याची आठवण करत यावेळी त्यांनी "नो कोरोनाचा" नवा नारा दिला. सोमवारपासून संसदीय अधिवेशन पार पडणार आहे, या अधिवेशनामध्ये विरोधकांनी गोंधळ घालू नये, असे आवाहन त्यांनी केले.

राकेश टिकेतांवर कारवाई करा

शेतकऱ्यांची मागणी असणारे तीनही कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेतले आहेत. तरीही सुरू असलेले आंदोलन थांबले पाहिजे. अन्यथा शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर कारवाई करावी, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईतील धरणातील जलसाठा ८८ टक्क्यांवर, १० टक्के पाणीकपात कधी संपणार? महत्त्वाची माहिती समोर

Ajinkya Rahane: क्रिकेट संपलं तुझं कौतुक कमी झालं, पण तूच आमचा खरा हिरो! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर आई वडिलांचं भावूक पत्र व्हायरल

Pune Bangalore Highway : पहिल्याच पावसात 6 पदरी महामार्गाचे पितळ उघडे! गांधी रुग्णालयाजवळ उड्डाणपुलाची भिंत कोसळली; प्रवास बनला धोकादायक, निकृष्ट कामाबद्दल कारवाई होणार का?

Latest Marathi News Live Update : भिवंडी इमारत दुर्घटना : दोषींवर कठोर कारवाईचे आदेश; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी भेट

Pune News: आळेफाटा येथील जिल्हा परीषदेच्या शाळेजवळ अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी कचरा टाकणा-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी

SCROLL FOR NEXT