Ramdas Kadam v/s uddhav Thackeray matoshree Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ramdas Kadam : 'त्या' दिवसापासून आजपर्यंत मी मातोश्रीवर गेलेलो नाही - रामदास कदम

'महाविकास आघाडीतून बाहेर पडा, आमदारांना मी समजावतो, पण उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीची साथ सोडली नाही'

सकाळ डिजिटल टीम

'महाविकास आघाडीतून बाहेर पडा, आमदारांना मी समजावतो, पण उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीची साथ सोडली नाही'

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल सुरु आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीका होत आहे. सध्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा राज्यभर सुरु आहे. दरम्यान, आज रामदास कदम यांनी एका मुलाखतीतून आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी कदम यांनी 'त्या' दिवसापासून आजपर्यंत मी मातोश्रीवर गेलेलो नाही, असं वक्तव्य केलं आहे. (Ramdas Kadam v/s uddhav Thackeray matoshree)

मागाली काही दिवसांपूर्वी रामदास कदम हे सेनेतून बाहेर पडले आहेत. त्यांचा मुलगा आमदार योगेश कदम यांच्यानंतर आता त्यांनीही शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी एका पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना ते भावनिक झाले होते. सेनेत माझ्यावर अन्याय झाला असं वक्तव्य कदम यांनी केलं होतं.

यावेळी रामदास कदम म्हणाले, शिवसेना वाढवण्यात माझे योगदान आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मातोश्रीवर फोन केले होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा फायदा अजित पवारांनी घेतला. त्यांनी आपल्या पक्षाची कामे केली. आधीपासूनच शिवसेना संपवण्याचा राष्ट्रवादीचा हेतू होता, अशी हल्लाबोलही कदम यांनी केला आहे.

मी गद्दारी नाही उठाव केला आहे, असं वक्तव्य करत कदम म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडणारे गद्दार असतात. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केलेली नाही. आमदारांच्या बंडानंतर मातोश्रीवरून फोन आले होते. त्यावेळी मी त्यांचे फोन घेतले नाहीत. मी मध्यस्थी करायला तयार होतो. शिंदे गटाकडून सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडण्याचा निरोप आला होता. महाविकास आघाडीतून बाहेर पडा, आमदारांना समजावतो असंही मी सांगितलं होतं, पण उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीची साथ सोडली नाही.

पुढे ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. आदित्य ठाकरे वाईट पद्धतीने आमदारांवर टीका करत आहेत. आदित्य ठाकरेंना अशी भाषा शोभत नाही. आदित्य ठाकरे 32 वर्षाचे आहेत आणि माझे सेनेसाठी 52 वर्षाचे योगदान आहे. उद्धव ठाकरेंसोबतच्या लोकांनी गैरसमज निर्माण केले असे म्हणत त्यांनी सुभाष देसाईंवर निशाण साधला आहे. खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे ताण वाढला, असंही कदमांनी स्पष्ट केलं.

अजून किती जणांच्या सेनेतून हक्कलपट्ट्या करणार आहात असा सवालही त्यांनी शिवसेना प्रमुखांना केला आहे. ते म्हणाले, सेनेसाठी मनीषा कायदे यांचे कर्तृत्व काय होतं? प्रियांका चतुर्वेदींचे पक्षासाठी काय योगदान आहे? आम्ही सेनेसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. बाळासाहेब गेल्यानंतर मला डावललं गेल, हे मला कळत होतं. कार्यकर्त्यांना आदर दिल्यानं पक्ष मोठा होतो, हे बहुदा सेना प्रमुखांना कळत नसावं, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी ठाकरेंना लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

SCROLL FOR NEXT