Ramdas Kadam latest Marathi News Ramdas Kadam latest Marathi News
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेला मोठा धक्का : माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा राजीनामा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता गमावलेल्या शिवसेनेला आणखी एक मोठा झटका बसला आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी राजीनामा पाठवला आहे. याआधी कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले होते. (Ramdas Kadam latest Marathi News)

रामदास कदम (Ramdas Kadam) हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेही राहिले आहे. त्यांना देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री करण्यात आले होते. रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम दापोलीतून आमदार आहे. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या गुवाहाटीला पोहोचलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये योगेश यांचा समावेश होता.

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. शिवसेनेच्या (Shiv sena) बंडखोर आमदारांसह ते सुरतला गेले. त्यानंतर तेथून गुवाहाटी येथे पोहोचले. शिवसेनेत फूट पडल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले. यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांच्याकडे ५० आमदार आहेत. यामध्ये शिवसेनेच्या ४० आमदार आणि १० अपक्ष आमदारांचा समावेश आहे.

शिवसेनेत फूट सुरूच

शिवसेनेत पक्ष सोडणाऱ्या नेत्यांचे दौर सुरूच आहे. यापूर्वी ५५ पैकी ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केले. यानंतर ठाणे, नवी मुंबईसह अनेक पालिकांमधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. नुकतेच शिवसेना युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT