Ramdas Kadam 
महाराष्ट्र बातम्या

Ramdas Kadam: 'माझ्या नादाला लागू नका', ठाकरेंच्या सभेनंतर रामदास कदम संतापले

ठाकरेंचे हात भ्रष्टाचाराने बरबरटलेले आहेत, रामदास कदमांची टीका

सकाळ डिजिटल टीम

निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत दिलेल्या मोठ्या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल खेडमध्ये पहिलीच सभा घेतली. सभेत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला केला. त्यानंतर रामदास कदम यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरेंचे हात भ्रष्टाचाराने बरबरटलेले आहेत, माझ्या नादाला लागू नका अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Ramdas Kadam Shiv Sena Uddhav Thackeray Ratnagiri Khed Sabha maharashtra politics )

पत्रकार परिषदेत बोलताना रामदास कदम म्हणाले....

बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर तुम्ही बेभान झाला. शिवसेना माझी प्रायव्हेट लि. कंपनी आहे असं वागले. मी म्हणेल तेच होईल. हुकुमशहा प्रवृत्तीसारखे उद्धव ठाकरे वागले. मला बदनाम करण्याचं राजकारण तुम्ही केले. बाप मुख्यमंत्री, बेटा मंत्री आणि नेते बाहेर. आम्हालाही बोलता येते.

तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

ज्याच्या हातात धनुष्यबाण तो चोर असं म्हणता. मात्र हे पवित्र धनुष्यबाण तुम्हाला मिळू शकले नाही. भांडुपचा आमदार अशोक पाटील यांनी जाहीर सभेत आमदारकीचा सौदा किती कोटीत झाला हे जाहीरपणे सांगितले होते. तिकीट देण्यासाठी, कापण्यासाठी तुम्ही पैसे घेत असाल तर अशा भ्रष्टाचाराने बरबरटलेल्या हातात धनुष्यबाण राहील का? ज्याला कावीळ असेल त्याला जग पिवळे दिसते.

सुरुवात तुमची, शेवट माझा.. मी बाहेर पडणार. अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भविष्यात द्यावी लागणार आहेत. माझ्या नादाला लागू नका. मी शांत बसलोय, मला डिवचण्याचा प्रयत्न करू नका.

Farmers Suicide: कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडमध्ये दोन शेतकऱ्यांची आत्महत्या!

तुमच्या वडिलांच्या विचारांची बेईमानी तुम्हीच केले. त्या वडिलांचे नाव सांगण्याचा अधिकार तुम्हाला हवे की नाही याचे आत्मपरिक्षण करा. हे चोरलं, ते चोरलं मग तू काय करतोय? झोपलाय का? असा संतप्त सवाल कदम यांनी यावेळी ठाकरेंना केला.

तसेच, माझा मुलगा योगेश कदमांना संपवण्याचं कटकारस्थान उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये असताना केले गेले. स्थानिक आमदार असताना पक्षातील नेत्यालाच संपवण्याचं काम तुम्ही केले. तुमच्या सगळ्यांना मी १९ तारखेला उत्तर देणार आहे. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मागच्या निवडणुकीत मला पाडण्याची सुपारी उद्धव ठाकरेंनी दिली होती. गुहागरच्या राजकारणातून भास्कर जाधव तुला गाडला नाही तर बघ. मतदारसंघातील जनता तुलाच उत्तर देईल.

Maharashtra Politics: शिंदे फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

रामदास कदमांवर बोलण्याची भास्कर जाधवची औकात आहे का? निवडणुकीत जाधवांना तिकीट देण्यास कुणी सांगितले होते. १९९५ साली मी बाळासाहेबांना सांगितले होते तेव्हा जाधवांना तिकीट मिळाले. जमिनीवर साष्टांग नमस्कार घालून माझ्या पाया पडला होता अशी टीका कदम यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT