महाराष्ट्र बातम्या

रामदास कदम, अनंत गीतेंना शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे निमंत्रण नाही?

शिवसेनेत नेमकं काय सुरु आहे?

दीनानाथ परब

मुंबई: येत्या १५ ऑक्टोबरला मुंबईत षणमुखानंद हॉलमध्ये (Shanmukhanand Hall) शिवसेनेचा (shivsena) दसरा मेळावा (Dussehra rally) होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादीत नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना नेता रामदास कदम (Ramdas kadam) यांची अनुपस्थिती दिसू शकते. निमंत्रितांच्या यादीतून रामदास कदम यांचे नाव वगळण्याचे संकेत मिळत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे पक्षनेतृत्व रामदास कदम यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी मनसेचे खेडमधील नेते वैभव खेडेकर यांनी ही क्लिप समोर आणली होती. परिवहन मंत्री अनिल परब यांना अडचणीत आणण्यामागे रामदास कदम असल्याचे बोलले जाते. रामदास कदम यांनीच किरीट सोमय्यांना रसद पुरवल्याचा आरोप आहे. त्यामुळे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना दसरा मेळाव्यापासून दूर ठेवण्यात येऊ शकते. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

"दसरा मेळाव्यासाठी आम्ही मर्यादीत लोकांना निमंत्रित करत आहोत. यात मंत्री, नेते आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. आम्ही कोविड-१९ च्या प्रोटोकॉल्सचे पालन करत आहोत. प्रत्येकाला सामावून घेणे शक्य नाही. पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांसोबत रामदास कदम यांचे नाव निमंत्रितांच्या यादीतून वगळले जाऊ शकते" असे पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांना सुद्धा दसरा मेळाव्यापासून लांब ठेवण्यात येऊ शकते असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. मध्यंतरी अनंत गीते यांनी शरद पवारांवर बोचरी टीका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

T20 WC, IND vs ZIM: संजू सॅमसन, अक्षर पटेलचं पुनरागमन होणार, पण मग कोणाला मिळणार डच्चू? अशी असेल भारताची Playing XI

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या वणीत आलिशान दुमजली घरात बनावटी दारू कारखाना,राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

Illegal Cattle : कुपवाडमध्ये कत्तलीसाठी जनावरांची अमानुष वाहतूक; पोलिसांची धडक कारवाई, पाच जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT