Ajit Pawar News esakal
महाराष्ट्र बातम्या

Raosaheb Danve : बहुमताच्या बाजूने आले तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात; दानवेंच्या विधानाने चर्चा

संतोष कानडे

मुंबईः सकाळ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत विधान केलं होतं. त्याला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दावने यांनी उत्तर दिलं आहे.

सकाळ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत, आता २०२४ ला मुख्यमंत्रीपदावर तुम्ही क्लेम करणार का? असा प्रश्न विचारला असता, त्यावर अजित पवार म्हणाले की, क्लेम २०२४ ला का? आताच करणार, असं म्हणून अजित पवारांनी सूचक विधान केलं. त्यांच्या या विधानामुळे एकच हशा पिकला होता.

पवारांच्या या विधानावरुन आता प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, मुख्यमंत्रीपदावर दावा करणं वेगळं आणि बहुमत असणं वेगळं. ते बहुमताच्या बाजूने आले किंवा त्यांना बहुमत मिळालं तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात.

दानवे पुढे म्हणाले की, अजित पवार हे धडाडीचे नेते आहेत. ते जे बोलतात त्याकडे राज्याचं लक्ष असतं. मात्र मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना बहुमत लागेल, हे नक्की.

हेही वाचाः संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दरम्यान, मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदेंना टोला लगावताना अजित पवार म्हणाले, "जसंजसं लोकांना अनुभव येतात, माहिती मिळत जाते, तेव्हा तुम्हाला ठासून तुमची भूमिका मांडता येते. एखाद्याला माहिती नसेल तर इतकी भंबेरी उडते मी मी म्हणणारे देशाचे पंतप्रधान मुर्मु म्हणण्याची वेळ येते..किंवा MPSC विषय निवडणूक आयोगाकडे आहे का माहित नसतं. हे अनुभवातून शिकत जातील मग तयार होतील.. तयार होईपर्यंत पद जाईल."

यावेळी अजित पवार यांना विचारण्यात आलं की, २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी होती. त्यावर अजित पवार म्हणाले की, २००४ मध्ये काँग्रेसपेक्षा आमच्या जागा अधिक आल्या होत्या. त्यावेळी आम्हाला संधी होती. तेव्हा आम्ही आर.आर. पाटलांना विधीमंडळ नेता म्हणून निवडले होते. त्यामुळे सहाजिकच मुख्यमंत्री आर.आर. पाटील झाले असते. मात्र हे दिल्लीतून ठरलं होतं, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT