Raosaheb Danve News saka
महाराष्ट्र बातम्या

...तरंच संभाजीराजेंचा मान शिवसेना ठेवू शकेल; दानवेंचा राऊतांना सल्ला

शिवसेनेची ऑफर धुडकावून लावत संभाजीराजेंनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय.

दत्ता लवांडे

मुंबई : राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचं संभाजी राजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेकडून आलेली ऑफर त्यांनी धुडकावून लावत अपक्ष लढण्यावर ते ठाम आहेत. दरम्यान शिवसेनेच्या दोन जागेपैकी पहिल्या जागेवर जी मत पक्की आहेत त्या जागेवर संभाजीराजेंना उमेदवारी दिली पाहिजे असं मत भाजपाचे रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे.

(Raosaheb Danve News)

भाजपाचे रावसाहेब दानवे माध्यमांना बोलत होते. ज्या जागेवरची मतं पक्के आहेत त्या जागेवर संभाजीराजेंना उमेदवारी दिली पाहिजे आणि सहाव्या नंबरवर संजय राऊतांनी जावं. तरंच संभाजी राजेंचा मान राखला जाईल असं ते म्हणाले. "केंद्र सरकारने पेट्रोलचे भाव कमी झाल्यावरून ते म्हणाले कोणत्याही देशाचं सरकार पेट्रोलचे भाव कमी करू शकत नाही. कोणत्याही पक्षाचे सरकार असलं तरी एका दिवसात दोन वेळा भाव वाढवण्याची किंवा कमी करण्याची पद्धत नाही. पेट्रोलचे भाव कोणतेही सरकार ठरवत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील भावावरून पेट्रोलचे भाव ठरत असतात. राज्य आणि केंद्र सरकारकडून आकारला जाणारा कर कमी केला तर भाव कमी होत असतात." असं दानवे म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी त्यावेळी आश्वासन दिलं होतं. त्यावरून केंद्राने कर कमी केला तसंच भाजपाशासित राज्यानेसुद्धा पेट्रोलवरील कर कमी करून जनतेला आधार दिला आहे. इतर राज्याबरोबर महाराष्ट्राने देखील कर कमी करायला पाहिजे असं दानवे म्हणाले आहेत. आत्ता सध्या जो कर कमी करण्यात आला आहे त्याचा कोणताही परिणाम दिसत नाही असा टोला त्यांनी लावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT