raosaheb danve esakal
महाराष्ट्र बातम्या

महाविकास आघाडी भाजपला रोखू शकत नाही, रावसाहेब दानवे यांचे खुले आव्हान

या राज्यात अमित शहा, नरेंद्र मोदी आले. त्यांनी सांगितले की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील.

सकाळ डिजिटल टीम

जालना : महाविकास आघाडी भाजपला रोखू शकत नाही, असे आव्हान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिले. आज बुधवारी (ता.१५) जालना (Jalna) येथे भाजपच्या वतीने जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. या राज्यात अमित शहा, नरेंद्र मोदी आले. त्यांनी सांगितले की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील. आपल्या मतांची चोरी झाली. दगाफटका झाला. आम्ही शेतकरी लोक आहोत. आमदार, खासदार हे या जनतेचा सालदार असतात. (Raosaheb Danve Says, Mahavikas Aghadi Can Not Stop BJP)

शिवसेनेने पाच कामे सांगावे जे केले? मी पाच काय दहा कामे सांगतो, असे दानवे म्हणाले. जालना शहराला सिमेंटचा रिंगरोड नाही. देशातील ड्रायपोर्ट येथे होत आहे. आमचे शासन असते तर समृद्धी महामार्ग पूर्ण झाला असता. आम्ही नागपूर आणि मुंबईला गेलो, तर सिमेंटचा रस्ता आहे, असे दानवे म्हणाले.

या मोर्चात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT