accident  sakal
महाराष्ट्र बातम्या

Ratnagiri Accident: रत्नागिरी-दापोलीतील आसूदजवळ भीषण अपघात; आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू

ट्रक-डमडमची धडक; सहा जण जखमी, मृतांत बाप-लेकीसह दोन मुलांचा समावेश

सकाळ डिजिटल टीम

दाभोळ: दापोली-हर्णै मार्गांवरील आसूद जोशीआळीजवळील वळणावर दापोलीतून आंजर्लेकडे प्रवासी वाहतूक करणारी डमडम व दापोलीकडे येणारा ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत डमडम चालक अनिल (बॉबी) सारंग यांच्यासह आठ प्रवाशांचा मृत्यू झाला.

यात दोन मुलांचा समावेश आहे. सर्व मृत प्रवासी पाजपंढरीजवळील अडखळ येथील आहेत. अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी दोनच्या सुमारास सुमारास अनिल (बॉबी) हे त्यांची डमडम (एमएच-०८ ५२०८) हे दापोलीतून आंजर्लेकडे १४ प्रवासी घेऊन जात असताना त्यांची डमडम आसूद जोशीआळीनजीक असलेल्या वळणावर आली असता समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने बाहेरून टर्न मारल्याने डमडम ट्रकवर आदळली.

त्यानंतर ट्रकने डमडमला रस्त्याच्या डाव्या बाजूला घासत नेले. हा अपघात एवढा भयानक होता की डमडमचा चक्काचूर झाला. डमडममधील पाच जण जागीच तर दोघांचा रुग्णालयात आणि एका महिलेचा डेरवण येथे नेत असताना मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच दापोलीचे पोलिस निरीक्षक विवेक आहिरे यांनी पोलिस कर्मचारी व रुग्णवाहिका घेऊन अपघातस्थळी धाव घेतली.

अपघातात चालक अनिल सारंग चालक (वय ४५, हर्णै), संदेश कदम (५५), स्वरा संदेश कदम (८), मारियम काझी (६४), फराह काझी (२७, सर्व अडखळ), मीरा महेश बोरकर (२२, रा. पाडले), वंदना चोगले (३४, रा. पाजपंढरी), सामीया इरफान शिरगांवकर अशा आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सामीया शिरगावकर यांचा डेरवण येथे नेत असताना मृत्यू झाला.

या अपघातात सपना संदेश कदम (३४, रा. अडखळ), श्रद्धा संदेश कदम (१४, रा. अडखळ), विनायक आशा चोगले (रा. पाजपंढरी), भूमी सावंत (१७), मुग्धा सावंत (१४), ज्योती चोगले (९, रा. पाजपंढरी) यांच्यावर उपजिल्हा व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात अडखळ येथील कदम कुटुंबातील बापलेकीचा मृत्यू झाला, तर पत्नी आणि एक मुलगी जखमी झाले आहेत.

आसूदजवळ भीषण अपघातात आठ ठार

दरम्यान, सहा प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असताना तब्बल १५ प्रवासी भरून ही डमडम आंजर्लेकडे जात होती. अपघाताची माहिती मिळताच अडखळ, हर्णै, पाजपंढरी, तसेच दापोलीकरांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

अपघात घडताच ट्रक चालक व क्लिनर यांनी अपघातस्थळावरून पळ काढला. त्यांचा शोध दापोली पोलिस घेत होते. सायंकाळी उशिरा दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, परंतु त्यांची नावे अद्याप उशिरापर्यंत समजलेली नाहीत. सायंकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मुणगेकर, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड दापोलीत दाखल झाले.

पत्नीसह मुलगी पोरकी

आसूद जोशी आळी येथे झालेल्या अपघातात अडखळ बौद्धवाडी येथील कदम कुटुंबावर काळाने घाला घातला. मृत संदेश कदम हा अडखळ बौद्धवाडी येथील राहणारा असून तो घरं बांधण्याची कंत्राट घेत असे. त्याच्यावरच त्याचं कुटुंब अवलंबून होत.

दोन दिवसांपूर्वी संदेश त्याच्या दोन मुली आणि पत्नी त्याच्या माहेरी भेटण्यासाठी गेले होते. आज याच वडापमधूनच घरी परतण्यासाठी दापोलीमधून निघाले आणि जोशीआळी येथे आल्यावर अपघात झाला.

अपघातात संदेश कदम व त्यांची छोटी मुलगी स्वरा यांचा जागीच मृत्यू झाला. त्याची पत्नी सपना व मोठी मुलगी श्रद्धा गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अडखळ, पाजपांढरी गावावर शोककळा

अपघातामुळे तालुक्यातील अडखळ व पाजपंढरी गावावर शोककळा पसरली आहे. डमडमचे चालक अनिल सारंग ३० वर्षे वाहन व्यवसायात होते. हर्णै येथील रहिवासी असलेले अनिल सारंग यांच्या मुलाचा आज वाढदिवस होता. त्यांचाही अपघातात मृत्यू झाला आहे.

कदम कुटुंबीय डेरवण येथे उपचार घेत असलेल्या एका नातेवाइकाला पाहण्यासाठी गेले होते. तेथून ते आज दुपारी दापोली बसस्थानकात आले व तेथून एसटीने गावी गेले नाहीत; तर त्यांनी भाजी खरेदी केली व वडापच्या थांब्यावर जाऊन ते डमडममध्ये बसले.

या अपघातात संदेश कदम व त्यांची मुलगी स्वरा यांचा मृत्यू झाला; तर त्यांच्या पत्नी सपना व दुसरी मुलगी श्रद्धा जखमी झाल्या असून, त्यांच्यावर दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भूमी सावंत व मुग्धा सावंत या बहिणी दापोली येथे लाठीकाठी स्पर्धेसाठी आल्या होत्या. घरी परतत असताना या अपघातात जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच हर्णै तसेच अडखळ येथील नागरिक मिळेल त्या वाहनाने उपजिल्हा रुग्णालयात आले.

दृष्टिक्षेपात

मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश

ट्रकचालक, क्लीनर पळाले

बाप-लेकीचा मृत्यू;

पत्नी, मुलगी जखमी

अपघात झाल्यावर घटनास्थळाची पाहणी केली. ट्रकचा वेग जास्त होता, ते सांगणारे काही साक्षीदार आमच्याकडे आहेत. आम्ही यापूर्वीही अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई केली होती आणि यापुढे

कारवाई करू.

- जयश्री गायकवाड,

अप्पर पोलिस अधिकारी, रत्नागिरी

मुख्यमंत्री सहाय्यतातून

जखमींना मदत देणार : आमदार योगेश कदम

खेड, ता. २५ : दापोली-आंजर्ले या मार्गावर आसूद येथे झालेल्या अपघातस्थळाची मी पाहणी केली. त्यानंतर तत्काळ अपघातग्रस्तांची भेट घेतली आहे. चूक कोणाची आहे आणि कुणामुळे हा अपघात झाला, हा विषय नंतरचा आहे.

प्रथमतः या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. यापुढे असा गंभीर अपघात होऊ नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. मी रुग्णालयातूनच तत्काळ स्थानिक पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे यासंदर्भात आदेश दिल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली.

ते म्हणाले, की एखाद्या वाहनाची जेवढी आसन क्षमता आहे. तेवढीच वाहतूक करणे बंधनकारक आहे. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी करण्याचे आदेश तात्काळ दिले आहेत. आपला जीव महत्त्वाचा असून अशा पद्धतीने जीवघेणा प्रवास टाळा या अपघातातील जखमींना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांपर्यंत मदत देण्याचा माझा प्रयत्न राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT