Ravi Rana News Ravi Rana counter-attack on Nitin Deshmukh
महाराष्ट्र बातम्या

Ravi Rana News: ठाकरे गटातील फडफड करणारा आमदार... ; रवी राणांचा मोठा दावा

सकाळ डिजिटल टीम

Ravi Rana News: अमरावतीतील आमदार रवी राणा यांनी ठाकरे गटाच्या आमदारावर पलटवार केला आहे. ठाकरे गटाचे विदर्भातील बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांनी रवी राणा यांना उत्तर देताना अपशब्दाचा वापर केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (Ravi Rana counter attack on Nitin Deshmukh)

राणा आणि देशमुख यांच्यातील वाद पेटण्याची शक्यता आहे.  बायकोच्या जीवावर आम्ही राजकारण करत नाही, असा टोला देशमुख यांनी रवी राणा यांना लगावला होता. यावर रवी राणा यांनी देखील पलटवार केला आहे.

आमदार रवी राणा म्हणाले, नितीन देशमुख कोण आहे हे मला अधिवेशनात माहित झाले होते. नागपूर पोलिसांना मारहाण प्रकरणात ३५३ त्यांच्यावर दाखल झाली होती. उद्धव ठाकरे यांच्यासोबत ज्यांनी ज्यांनी चुकीचे कामे केले. ज्यांनी पाप केलं आहे. त्या पापाचा घडा भरला आहे. 

हे कायद्याचे राज्य आहे. नियमाने चालणारे सरकार आहे. कोणी कायदे हातात घेतले तर त्याला कायदेशीर उत्तर देण्याचे काम एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये होणार आहे, असे राणा म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना टोला लगावताना रवी राणा म्हणाले, उद्धव ठाकरेंसमोर यांच्यासमोर त्यांचे साम्राज्य उध्वस्त झाले. ज्यांनी हनुमानाचा आणि रामाचा विरोध केला. त्यांच्या लंकेचा नाश झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी जे पाप केलं होतं त्यांना ते याच काळात भोगाव लागलं.

अहंकाराचा विषय संपला आहे.  हा जो फळफळ करणारा नितीन देशमुख आहे. जो खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे यांना धोका देऊन परत आला तो काही दिवसांनी शिंदे गटात दिसेल, असा दावा रवी राणा यांनी केला आहे. 

काय म्हणाले होते नितीन देशमुख

नितीन देशमुख यांनी रवी राणा यांच्यावर बोलताना अपशब्दांचा वापर केला आहे. नितीन देशमुख बायकोच्या भरवश्यावर राजकारण करणारा माणूस नाही. जनतेच्या आणि स्वत:च्या कामाच्या भरवश्यावर आम्ही राजकारण करतो, असे देशमुख म्हणाले.

हा ****** काय आम्हाला सांगोत की नितीन देशमुखांचा पापाचा घडा भरला. हा ****** मराठी माणसाच्या भरवश्यावर उभा झाला. हा महाराष्ट्रातील आहे का नाही हे सुद्धा लोकांना माहित नाही. तरी मराठी माणसाने यांना मोठ केलं. येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणसे त्याला त्याची जागा दाखवतील, अशी टीका नितीन देशमुख म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ग्लेन फिलिप्स फक्त मैदानातच उडत नाही, तर आकाशात विमानही उडवतो; स्वत:च शेअर केला Video

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

LPG E-KYC Mandatory : सिलिंडर हवाय? मग आधी 'हे' काम करा; गॅस केवायसीसाठी सरकारने दिली नवीन सोय

Gudi Padwa 2026 Recipes: साखरेच्या गाठी बाजारातून विकत घेण्याऐवजी घरीच तयार करा; इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कुठेच नाही मिळणार

SCROLL FOR NEXT