mla ravi rana  
महाराष्ट्र बातम्या

"पुढच्या दोन महिन्यात फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार" : रवी राणा

विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवारांची वर्णी लागली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : विधानपरिषदेचा निकाल अखेर जाहीर झाला असून भाजपने पाचही जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. त्यानंतर भाजपच्या गोटातून विजयी जल्लोष व्यक्त केला जात आहे. यामध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला असून महाविकास आघाडीच्या पाच उमेदवारांनी विधानपरिषदेवर वर्णी लावली आहे. भाजपच्या विजयानंतर अपक्ष आमदार रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

(Ravi Rana On MLC Election Result)

"पुढच्या दोन महिन्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. त्यासाठी लवकरच अविश्वास ठराव आणणार आहोत." असं अपक्ष पण भाजपला जाहीर पाठिंबा असलेले आमदार रवी राणा यांनी सांगितलं आहे. दरम्यान विधानपरिषदेच्या मतदानात काँग्रेसचे आणि शिवसेनेचे आमदार फुटले आहेत. शिवसेनेचे तब्बल १२ तर काँग्रेसचे ३ आमदार फुटले असल्याचं बोललं जातंय. तर भाजपचे प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीतील आमदारांनी सरकारवरील राग व्यक्त केला असल्याचं सांगितलं आहे.

काँग्रेसच्या मतफुटीवर जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली असून यासंदर्भात आम्हाला आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे. तर या विजयानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी महाविकासआघाडीवर निशाणा साधला आहे.

दरम्यान विधानपरिषद निवडणुकीचा निकाल पार पडला असून महाविकासआघाडीचे पाच तर भाजपचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, भाजपचे राम शिंदे, भाजपचे प्रविण दरेकर, शिवसेनेचे आमशा पाडवी, भाजपचे उमा खापरे, भाजपचे श्रीकांत भारतीय, शिवसेनेचे सचिन अहिर, राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर, भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT