Ravi Rana e sakal
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार विसरले, पण आम्ही... : रवी राणा

'हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसेचं पठण करावं'

सकाळ डिजिटल टीम

'हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसेचं पठण करावं'

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी हनुमान चालिसा वाचावी असं आम्हाला वाटतं. हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसेचं पठण करावं. बाळासाहेब ठाकरेंवर श्रद्धा असेल तर तुम्ही पठण कराल. शिवसेना हिंदूत्वाची दिशा सोडून दुसऱ्या दिशेने जात आहे, असा टोला रवी राणा यांनी लगावला आहे. महाराष्ट्राला साडेसाती लागली आहे, म्हणून हनुमान चालीसा पठण करा, असा सल्ला आम्ही दिला आहे. मात्र हिंदुत्वाची मतं घेऊन ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि आता विसर पडलाय, अशी टीका भाजपाचे रवी राणा यांनी केला आहे. आज ते मुंबईत बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाहीत. शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी हनुमान जयंती दिनी पठण करावे अशी विनंती केली होती. बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आहेत. त्यामुळे मातोश्रीवर हनुमान चाळीसा वाचन करावे अशी आमची इच्छा आहे. जे हनुमान चाळीसाला विरोध करतात ते बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक नाहीत. उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले आहेत. त्यांनी विघ्न संपविण्यासाठी हनुमान चाळीसा वाचली पाहिजे, असा सल्लाही यावेळी रवी राणा यांनी दिला आहे. काहीही झाले तरी आम्ही मात्र उद्या आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चाळीसा वाचणार, असा ठाम निर्णय रवी राणा यांनी दाखवला.

पुढे ते म्हणाले, आम्हाला पोलिसांनी नोटीस दिली आहे. आम्ही गोंधळ करण्यासाठी आलो नाही. महाराष्ट्रावर जे संकट आलं आहे ते दूर व्हावं यासाठी आम्ही हनुमान चाळीसा मातोश्रीवर वाचणार आहोत. उद्धव ठाकरे यांना सत्तेचा लोभ आला असून त्यांना हिंदुत्वाचा विसर पडला आहे. आमचा यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. त्यामुळे हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेही राखू शकत नाही असेही आमदार राणा म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT