Nawab Malik-Devendra Fadnavis google
महाराष्ट्र बातम्या

फडणवीसांना आमच्याविरोधात माहिती देणारे कच्चे खेळाडू; मलिकांचा पलटवार

फडणवीसांकडून राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की, दिवाळीनंतर ते राजकीय फटाके फोडणार आहेत. पण आम्हाला वाटतं की त्यांचे फटाके भिजले आणि वाजलेच नाहीत. फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांचा बॉम्बस्फोटाच्या लोकांशी संबंध असल्याचा माहोल तयार केला. पण त्यांना माहिती देणारे कच्चे खेळाडू आहेत, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांवर पलटवार केला आहे.

मलिक म्हणाले, देवेंद्र फडणवीस तुम्ही या शहरात १९९९ मध्ये आमदार बनून कदाचित पहिल्यांदा आला असाल. तुमच्याआधी दिवंगत गोपिनाथ मुंडे देखील भाजपचे नेते होते जे लोकांचा दाऊदशी संबंध जोडत होते. आम्ही जेव्हा मंत्री होतो तेव्हाही मुंडेंनी दाऊदबाबत विधानसभेत अनेक भाषणं केली. पण माझ्या ६२ वर्षांच्या जीवनात आणि लोकप्रतिनिधी झाल्यानंतर २६ वर्षांत माझ्यावर कोणीही असे आरोप लावू शकलं नाही.

आज एका जागेबाबत आपण काही कागदपत्रं लोकांच्या समोर ठेवलीत, ज्यामध्ये दीड लाख फूट जमीन कवडीमोल भावात एका माफियाच्या मार्फत आम्ही खरेदी केली. आम्हाला वाटतं की आपले जे खबरी आहेत. तुम्हाला माहिती देणारे कच्चे खेळाडून आहेत. तुम्ही म्हटला असता तर मीच सारी कागदपत्रे तुम्हाला दिली असती. अजूनही कागदपत्रे तुम्हाला उपलब्ध करुन दिली असती. पण आपण अंडरवर्ल्डचा खेळ सुरु केला आहे. उद्या सकाळी दहा वाजता देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्रात अंडरवर्ल्डचा काय खेळ आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी संपूर्ण शहराला कसं वेठीला धरलं होतं याची माहिती देईल, असा गंभीर आरोपही मलिक यांनी फडणवीसांवर केला.

मलिक म्हणाले, फडणवीसांच्या आरोपांनुसार आम्ही दीड लाख फूट जमीन खरेदी केली आणि बनावट भाडेकरी यामध्ये तयार केले. या दीड लाख फूट जमिनीवर एक मदिनातुल अमान नावाची सहकारी गृहसंस्था उभी आहे. सन १९८४ मध्ये ही इमारत तयार झाली. गोवावाला कम्पाऊंड नावानं ही इमारत ओळखली जाते. यामध्ये मुनीरा पटेल यानं रस्सीवाला याला विकसनाचे हक्क देत दीडशे घरं बांधून सर्वसामान्य लोकांना विकले. याच्या मागे जी जागा आहे तिथं मोठ्या प्रमाणावर झोपड्या आहेत. आमचं एक गोडाऊन तिथं आहे, जी जागा सॉलिडस इन्व्हेस्टमेंट कंपनीचं असून आम्हाला ती मुनीरा यांनी ३० वर्षांपासून भाड्यानं दिली होती. याचं प्रॉपर्टीवर पुढे आमची चार दुकानं होती. तुम्ही म्हणता की यामध्ये बनावट भाडेकरार करण्यात आला. सन १९९६मध्ये शिवसेना-भाजपचं सरकार होतं. ९ नोव्हेंबरचाच दिवस होता जेव्हा महाराष्ट्रात एक आश्चर्चकारक निकाल लागला होता. यावेळी नवाब मलिक या सरकारमध्ये पहिल्यांदा पोटनिवडणूक जिंकले होते. त्यावेळी माझं निवडणूक कार्यालय त्याच गोवावाला इमारतीत होतं. विजयाचा जल्लोषही तिथं साजरा करण्यात आला होता. आम्ही तिथं भाड्यानं राहत होतो. त्यावेळी मुनीरा यांनी आमच्याशी संपर्क करुन तुमच्याकडे जे गोडाऊन आहेत त्याची पूर्ण मालकी हक्क तुम्हाला देऊ इच्छितो त्यानंतर आम्ही ती मालकी घेतली. त्यानंतर सलीम पटेलकडे याची पॉवर ऑफ अॅटर्नी होती त्याच्याकडून आम्ही रजिस्ट्रेशन केलं, रितसर स्टँपड्युटी भरली. त्याची सगळी कागदपत्रे उपलब्ध आहेत. पण फडणवीसांनी हे सगळं वाढवून सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT