Sadabhau Khot vs Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांबद्दल सदाभाऊंचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, 'आता त्यांना गोळ्या घालणार का?'

शरद पवार यांनीदेखील समृद्धी महामार्गाच्या अपघात झाला, त्यावेळेस काही लोक ‘देवेंद्रवासी’ झाले, असा शब्दप्रयोग केला होता.

सकाळ डिजिटल टीम

शरद पवार यांनी तो अनवधानाने केला होता. म्हणून तुम्ही आता गोळ्या घालणार का?

सातारा : माझ्याकडून अनवधानाने ‘सैतान’ शब्द वापरला गेला आहे. गावगाड्यांमध्ये सैतान हा शब्द सहज वापरला जातो. माझी गावगाड्यातील भाषा इंडियातील लोकांना प्रस्थापितांना कडवट लागली.

मला सेनापती गावगाड्याकडे येत आहे, त्याला रोखूया असे म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना दिले. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर ‘सैतान’ हा शब्द प्रयोग केल्यानंतर त्यांच्यावर महाविकास आघाडीतून टीकेची झोड उठली.

यावर सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी साताऱ्यात पत्रकारांपुढे आपली भूमिका मांडली. माझ्याकडून अनवधानाने ‘सैतान’ हा शब्द गेला आहे. शरद पवार यांनीदेखील समृद्धी महामार्गाच्या अपघात झाला, त्यावेळेस काही लोक ‘देवेंद्रवासी’ झाले, असा शब्दप्रयोग केला होता; पण त्यांना हा शब्दप्रयोग करायचा नसावा.

परंतु, शरद पवार यांनी तो अनवधानाने केला होता. म्हणून तुम्ही आता गोळ्या घालणार का? कारण गुण्यागोविंदाने शिवसेना-भाजप सरकार नांदत असताना यामध्ये तोडाफोडी कोणी केली? याचा इतिहास तपासावा लागेल, असा खुलासा सदाभाऊ खोत यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT