महाराष्ट्र बातम्या

सहा हजार शिक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा, शिक्षणमंत्र्यांची टि्वटरद्वारे घोषणा

तेजस वाघमारे

मुंबई: कोरोनामुळे सरकारी नोकर भरती प्रक्रियेवर राज्य सरकारने बंधने आणली होती. मात्र आता शिक्षण सेवक भरतीला मान्यता मिळाली असून सुरुवातीला सहा हजार शिक्षण सेवकांची भरती होणार आहे. या उमेदवारांची निवड जुलै 2019 मध्ये करण्यात आली होती. यामुळे नियुक्ती होऊनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक सेवक पदभरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी टि्वटद्वारे जाहीर केले आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांवर वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने सरकारी पदभरतीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र नुकत्याच झालेल्या बैठकीत पवित्र पोर्टलद्वारे सुरू असेलेली शिक्षक सेवक सरळसेवा पदभरती बंदीतून वगळण्यात आली आहे. यामुळे या भरतीला हिरवा कंदील मिळाला आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थासह खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील जवळपास 12 हजार 140 शिक्षण सवेक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार पवित्र प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने ही पदभरती होत आहे. मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी पाच हजार 822 उमेदवारांची यापूर्वीच निवड करण्यात आली होती. मात्र त्यांची नियुक्ती रखडली होती. त्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा होणार आहे. तर उर्वरित जागांवरील भरतीसाठी ही प्रक्रिया सुरू होणार आहे. शिक्षण सेवक पदांच्या भरतीला राज्य सरकारने विशेष परवानगी दिली असली तरी प्रत्यक्षात त्यासाठीच्या अंतर्गत बाबींची पूर्तता करण्यासाठी किमान एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया नवीन वर्षात सुरू होईल असे सूत्रांनी सांगितले.

एसईबीसी आरक्षणाबाबत स्पष्टता हवी

राज्य सरकारने प्रवेश देताना ‘सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरीता’(एसईबीसी) आरक्षित जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याचा निर्णय घेतला. या पदभरतीमध्येही एसईबीसी प्रवर्गात जागा राखीव होत्या. प्रवेश प्रक्रिया आणि पदभरती यात फरक असल्याने सरकारने याबाबत अधिक स्पष्टीकरण करावे अशी मागणी प्रशासनातर्फे करण्यात आल्याचे समजते. याबाबत खुलासा झाल्यानंतरच तांत्रिक बाबींची पूर्तता करून प्रक्रिया पुढे सुरू होईल. 
 
स्थानिक स्वराज्य संस्था - 7 हजार 888
खाजगी संस्था - 4 हजार 252
एकूण जागा - 12 हजार 140
मुलाखतीशिवाय पदभरतीच्या जागा - 9 हजार 129 त्यातील 5 हजार 822 उमेदवारांच्या नियुक्तीसाठीची यादी जुलैमध्ये प्रसिद्ध
.

------------------

(संपादन- पूजा विचारे)

Recruitment 6 thousand teachers  announced by Minister of Education via Twitter

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT