police recruitment

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

२५ ऑक्टोबरच्या अंकात सकाळने ‘आचारसंहितेत अडकणार पोलिस भरती’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर राज्याच्या गृह विभागाने आचारसंहितेची शक्यता गृहित धरून पोलिस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. उद्यापासून (ता. २९) उमेदवारांना पोलिस भरतीसाठी अर्ज करता येणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात १५ हजार ६३१ पोलिस शिपायांची पदभरती होणार आहे. त्यात सोलापूर ग्रामीणमधील ९०, सोलापूर शहर पोलिसांकडील ९६ आणि राज्य राखीव पोलिस बल व कारागृह शिपाई यांची सुमारे ५५ पदे आहेत. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी २९ ऑक्टोबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात रिक्त होणारी पोलिस शिपाई, चालक शिपाई, बॅण्डसमन, सशस्त्र पोलिस शिपाई व कारागृह शिपाई, अशी रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळाने ऑगस्टमध्ये मान्यता दिली होती. पण, अर्ज भरण्याची प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू झालेली नव्हती. त्यासंदर्भात २५ ऑक्टोबरच्या अंकात सकाळने ‘आचारसंहितेत अडकणार पोलिस भरती’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर राज्याच्या गृह विभागाने आचारसंहितेची शक्यता गृहित धरून पोलिस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

उद्यापासून (ता. २९) उमेदवारांना पोलिस भरतीसाठी अर्ज करता येणार आहेत. दरम्यान, एका पदासाठी उमेदवारास एकाच जिल्ह्यात एकमेव अर्ज करता येणार आहे. एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज केल्यास ते अर्ज बाद ठरणार आहेत. मैदानी चाचणीत उत्तीर्ण (किमान ४० टक्के गुण आवश्यक) ठरलेल्यांमधून एका पदासाठी दहा जणांची लेखी परीक्षेसाठी निवड केली जाणार आहे. लेखी परीक्षेच्या मेरिटनुसार उमेदवारांची पोलिस पदांसाठी निवड होणार आहे.

राज्यातील पोलिसांची रिक्तपदे

  • पोलिस शिपाई : १२,३९९

  • चालक शिपाई : २३४

  • सशस्त्र पोलिस शिपाई : २,३९३

  • कारागृह शिपाई : ५८०

  • बॅण्डसमन : २५

  • एकूण : १५,६३१

‘या’ संकेतस्थळावर करा अर्ज

पोलिस भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी policerecruitment 2025.mahait.org हे संकेतस्थळ उपलब्ध असणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ४५० रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० रुपयांचे परीक्षा शुल्क असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

सायबर फ्रॉडपासून बचावासाठी ‘ही’ पंचसूत्री लक्षात ठेवाच! अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर रिकामे होईल बॅंक खाते; सोलापूर शहर सायबर पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT