Eknath Shinde
Eknath Shinde  Esakal
महाराष्ट्र

Eknath Shinde : लाल पिवळे ढग, विमान १० फूट उडलं अन्...; मुख्यमंत्र्यांनी सांगितला थरारक अनुभव

सकाळ डिजिटल टीम

आजकाल राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा, दौरे, भाषणं चांगलीच गाजत आहेत. अशातच त्यांच्या एका मुलाखतीवेळी त्यांनी विमानाचा एक किस्सा सांगितला आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची खिल्ली उडवली आहे. एकनाथ शिंदे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एक थरारक अनुभव सांगितला आहे.

ते म्हणाले मला आठवत की, मी बुलढाण्याला गेलो होतो. आणि त्यावेळी तिथले लोक म्हणाले, आम्हाला पूर्वीच्या प्रकल्पांचे पैसे मिळाले नाहीत. पूर्वीचे प्रकल्प आणि आताचे प्रकल्प यांच्यावर मला जायचं नाही परंतु या प्रकल्पांचे पैसे आरटीजीएसने तुमच्या खात्यात जमा होतील. ते म्हणाले हे तुम्ही कसं सांगू शकता यावेळी खात्री म्हणून खरेदी खतावर मी मुख्यमंत्री म्हणून मी सही करून टाकली आणि त्यानंतर परतत असताना आम्ही एक थरारक अनुभव अनुभवला आणि तो किस्सा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितला आहे.

हे ही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

ते म्हणाले, आम्ही सगळे विमानात होतो. तेव्हा पावसाळी वातावरणात आणि ढगाळ परिस्थिति असताना पायलटने विमान ढगामध्ये घातलं. ते काय निळे, लाल, पिवळे ढग होते त्यामध्ये विमान 10-10 फुट आपटत होतं. म्हणजे कार्यक्रम होणार होता. त्यानंतर आम्ही व्यवस्थित घरी पोहचलो. त्यानंतर त्या शेतकऱ्याचा फोन आला की, पैसे जमा झाले.

त्याचबरोबर याआधी एकदा त्यांचा आणखी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात की, मी विमानात बसलो होतो. लीलावती रुग्णालयात एका डॉक्टरला फोन करायचा होता. पण तो फोन लागत नव्हता. जेव्हा मी पायलटला सांगितलं की पाच मिनिटं थांब मला महत्त्वाचा फोन लावू द्या. तेव्हा त्यानं दहा मिनिटं विमान थांबवलं. माझी चर्चा झाली. आता मुख्यमंत्र्यांचं हे विमान जमिनीवरच होतं की हवेत होतं, हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. मात्र नेटकऱ्यांनी यावरुन मुख्यमंत्री शिंदेंची चांगलीच खिल्ली उडवली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

Pune-Delhi Flight : विमानाला धडक, चौकशीसाठी पथक;‘डीजीसीए’चे तीन सदस्य पुण्यात दाखल

VIDEO: "निवडणूक संपली, प्रचार संपला!"; रितेश आणि जिनिलियाचा व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

SCROLL FOR NEXT