महाराष्ट्र बातम्या

'कुबेरांचं पुस्तक मी वाचलंय'; ते आक्षेपार्ह वाटलं का? या प्रश्नावर शरद पवार म्हणतात...

सकाळ डिजिटल टीम

नाशिक: ज्येष्ठ लेखक आणि संपादक गिरीश कुबेर यांच्यावर आज नाशिक येथील साहित्य संमेलनामध्ये संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक करुन हल्ला करण्यात आला आहे. त्यांनी लिहलेलं ‘Renaissance State’ या पुस्तकावर सध्या महाराष्ट्रात बराच वाद सुरु आहे. या पुस्तकात कुबेर यांनी आक्षेपार्ह लिखाण केल्याचा ठपका अनेकांनी ठेवला आहे. अनेक राजकीय पक्ष, विविध संघटना, गट आणि लोकांकडून पुस्तकारावर बंदी आणण्याची देखील मागणी केली होती. त्यांच्यावर झालेल्या या शाईफेकीच्या घटनेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मत मांडलंय. त्यांनी म्हटलंय की, आपल्याकडे लोकशाही असून लोकशाहीत मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. विरोध करण्याचाही अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र व्यक्तिगत हल्ला करणे चुकीचा आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार यांनी या घटनेचा निषेध करताना म्हटलंय की, हा वाद गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सुरु होती. कुबेरांचं हे पुस्तक मी स्वत: वाचलेलं आहे. कुबेरांना लोकशाहीमध्ये स्वत:ची मते मांडण्याचा अधिकार आहे. या मतांचा विरोध करणारे दुसरे घटकही असू शकतात. या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण स्विकारलेलं आहे. आणि ते स्वातंत्र्य असल्यामुळे एखादी गोष्ट एखाद्या लेखकानं लिहली तर त्याबद्दल व्यक्तिगत हल्ला करणं ही गोष्ट अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी असून चुकीची आहे. आम्ही कुणीही कधीही त्याचा पुरस्कार करणार नाही. ही घटना घडणे महाराष्ट्राला शोभत नाही. आणि विशेषत: ज्या परिसरामध्ये हा सोहळा इतक्या उत्साहाने सुरु आहे, अशा परिसरामध्ये अशी घटना घडणे अत्यंत चुकीचं आहे, असं त्यांनी म्हटलंय.

तुम्ही पुस्तक वाचलेलं आहात, तुम्हाला त्यात काही आक्षेपार्ह आढळलं का? या प्रश्नावर शरद पवार यांनी म्हटलंय की, त्यांची काही मते आहेत, मी काही इतिहासाचा तज्ज्ञ नाही. मी जास्त खोलात गेलो नाही. त्यांची मते मान्य नसतील तर तुम्हीही लिहू शकता. मते मांडू शकता, मात्र हल्ला करु शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : सामनाही गमावला अन् आता BCCIचा कारवाईचा बडगा... हार्दिक पांड्याची दुतर्फा गोची, पुन्हा असं केल्यास बंदी?

स्वरांच्या युगाचा अंत ! आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामामात पार पडले अंत्यसंस्कार

ICC चा मोठा धमाका! टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा; IPL लाही टक्कर देत रकमेत १० पट वाढ

Shahajibapu Patil: तर शिवसेनेचे ५-६ आमदार निवडून येतील: शहाजीबापू पाटील, सोलापूरमध्ये तानाजी सावंत यांना लक्ष घालायला सांगा!

IPL 2026 : टीम डेव्हिडची सर्व 'मस्ती' उतरवली; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरने समाजावूनही ऐकला नाही, आता... Video

SCROLL FOR NEXT