Gavit Sisters Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

नऊ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींची फाशी रद्द

राज्यभरात खळबळ निर्माण झालेल्या या घटनेत ९ बालकांची हत्या करण्यात आली होती.

सुधीर काकडे

१९९० च्या दशकात महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुलं गायब होत होती. त्यावेळी समोर आलेल्या प्रकरणात कोल्हापूरच्या गावित बहिणींचा हात असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर वेगवेगळ्या धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. या गावित बहिणींनी तब्बल ९ बालकांची निर्घून हत्या केली होती. गावित बहिणींना मुंबई हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गावित बहिणींची फाशी रद्द करण्याची याचिका हायकोर्टानं स्वीकारली आहे. दिलेल्या शिक्षेची अमलबजावणी करण्यात प्रशासनानं विलंब केल्याचंही मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court) सांगितलं. रेणुका शिंदे (Renuka Shinde) आणि सीमा गावित (Seema Gavit) या दोन बहिणींचा यामध्ये समावेश आहे. बालकांचं अपहरण करून, भीक मागण्यासाठी त्या त्यांचा वापर करत असत. यातले काही जण मोठे झाल्यानंतर त्यांनी आपल्या पार्श्वभूमिबद्दल प्रश्न उपस्थित केले असता, त्यांचे खून करण्यात आले.

कोर्टाने यावेळी प्रशासनाच्या कारवाईवर ताशेरे ओढले आहेत. यावेळी कोर्टाने, आरोपींचा गुन्हा माफी देण्यासारखा नाही, मात्र प्रशासनाच्या उदासिनतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं सांगतिलं. मुंबई हायकोर्टाने गावित बहिणींना मोठा दिलासा दिला आहे. तब्बल २० वर्षानंतर त्यांची फाशी रद्द करण्यात आली आहे. २००१ रेणुका शिंदे, सीमा गावित यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र त्यानंतर प्रशासनाने ही कारवाई करण्यास दिरंगाई झाली. त्यानंतर त्या दोघीही बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

१९९६ साली झालेल्या या लहान मुलांच्या हत्याकांडाच्या आरोपी असलेल्या रेणुका आणि सीमा या दोघी बहिणींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र त्यानंतरच्या काळात प्रशासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे या कारवाईला उशीर झाला. फाशीच्या शिक्षेचं रुपांतर जन्मठेपेत करण्यात आलं. मात्र त्यांनी केलेल्या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाने केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar: जीवनाचं चक्र पूर्ण...! सचिनचा लॉर्ड्सवर ENG vs IND कसोटीदरम्यान अनोखा सन्मान; पाहा फोटो

Vasmat Accident : ऑटो व बसची समोरासमोर धडक; दोन महिलांचा मृत्यू, एका महिलेची प्रकृती गंभीर

Latest Maharashtra News Updates : विधीमंडळात आमदारांना धक्काबुक्की

Mumbai Goa Highway: रस्त्यांना तडे अन् जागोजागी खड्डे, मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था, ठाकरे गटाकडून पोलखोल

Nashik News : कामगार मोर्च्यामुळे स्मार्ट रोडवर वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गही फसले

SCROLL FOR NEXT