Eknath Shinde Group esakal
महाराष्ट्र बातम्या

'हिंदुत्व.. हिंदुत्व म्हणणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार दलित आणि वंचितविरोधी आहेत'

सकाळ डिजिटल टीम

'ठाकरे सरकार शाहू, फुले, आंबेडकरांच्या तत्वावर काम करत असल्याचं या बंडखोर आमदारांना पहावलं नाही.'

Maharashtra Political Crisis : सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात सुरू असलेला वाद चांगलाच चिघळलाय. शिवसेनेतील अंतर्गत बंडानं कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. अशातच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं (खरात गट) एकनाथ शिंदे गटावर निशाणा (Republican Party of India, Kharat group) साधलाय. एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेचे बंडखोर आमदार हे दलित आणि वंचितविरोधी असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात गट) नेते सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केलाय.

मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना खरात यांनी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या तत्वावर काम करत असल्याचं या बंडखोर शिवसेना (Shiv Sena) आमदारांना पहावलं नाही, असा आरोप त्यांनी केलाय. हे बंडखोर आमदार स्वत: हिंदूत्व मानत असल्याचं आपल्याला वाटतं नसल्याचंही खरात यांनी म्हटलंय.

यावेळी खरात यांनी बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंवरही टीका केलीय. ज्या वेळेस राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर काही कालावधीमध्ये महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट आलं, असं खरात यांनी म्हटलंय. हे सरकार आल्यानंतर काही कालावधीमध्येच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाची लाट पसलेली होती. त्या कालावधीमध्ये राज्य सरकार मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलेलं असतानाही दादारमधील इंदू मीलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक होतंय त्याचं काम या सरकारनं सुरु ठेवलंय, असंही खरात यांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT