obc  esakal
महाराष्ट्र बातम्या

OBC जातनिहाय जनगणनेचा निर्णय; मागासवर्ग आयोगाची शिफारस

विनायक होगाडे

पुणे : राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या (ओबीसी) आरक्षणासाठी निकष आणि संख्यात्मक आधारावर माहिती (इम्पिरिकल डेटा) एकत्रित करण्यात येत आहे. त्यानुसार ओबीसी आणि व्हीजेएनटी यांची लोकसंख्या किती आहे, यासाठी जातीनिहाय जनगणना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत सोमवारी (ता. २) घेण्यात आला. तसेच, जनगणनेचे काम सरकारी यंत्रणेमार्फतच करण्याची शिफारस राज्य सरकारला करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेमधील इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाची नेमणूक केली आहे. त्यासाठी आयोगाकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा एकत्रित करण्यात येत आहे. या अनुषंगाने आयोगाची बैठक आज पार पडली. आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्या. आनंद निरगुडे यांच्यासह सर्व सदस्य बैठकीस उपस्थित होते. या बैठकीला समाजशास्त्रातील तज्ज्ञ, विविध विद्यापीठांमधील प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले होते.

मागासवर्ग आयोगाचे सदस्य सचिव लक्ष्मण हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्पेरिकल डेटासाठी ज्या बाबी आवश्यक आहेत, ती सर्व माहिती सरकारी यंत्रणेमार्फत गोळा करण्यात येत आहे. त्यामध्ये इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी आवश्यक निकष तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या तुलनेत ओबीसींची संख्या किती आहे, याबाबत आयोगाने काम सुरू केले आहे. तसेच, ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीची (व्हीजेएनटी) लोकसंख्या किती आहे, याचीही माहिती एकत्रित करावी लागणार आहे. त्यासाठी आयोगाने ओबीसी आणि व्हीजेएनटी यांची जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाला मार्चमध्ये रोजी स्थगिती दिली आहे. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. हे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात इम्पिरिकल डेटा द्यावा लागणार आहे. राज्य सरकारने आयोगाला ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे निर्देश दिले होते.

----------

आर्थिक तरतुदी कागदावरच

मागासवर्ग आयोगाला केवळ नऊ कर्मचारी देण्यात आले आहेत. त्यापैकी सध्या चार कर्मचारी कार्यरत आहेत. आर्थिक तरतुदीही कागदावरच असून, उसनवारीवर काम करण्यात येत असल्याची खंत आयोगाचे सदस्य ॲड. बी.एल.सागर किल्लारीकर यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT