PM Modi BBC Documentary 
महाराष्ट्र बातम्या

PM Modi BBC Documentary : मोदींवरील बीबीसी डॉक्युमेंटरीविरोधात विधानसभेत ठराव मंजूर

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र विधानसभेत आज शनिवार बीबीसीच्या डॉक्युमेंटरी विरोधात प्रस्ताव मंजूर केला आहे.  बीबीसीने नरेंद्र मोदी यांच्याविरोधात  डॉक्युमेंटरी प्रसारित केली होती. गुजरात दंगलीवरून नरेंद्र मोदींना सवाल करण्यात आले होते. त्यामुळे देशभरात भाजपमध्ये संतापाची लाट होती. यावर  डॉक्युमेंटरीवर  केंद्र सरकारने बंदी घातली होती. 

दरम्यान या  डॉक्युमेंटरीवरुन आज महाराष्ट्र विधानसभेत देखील गोंधळ झाला. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने  बीबीसीच्या डॉक्युमेंटरी विरोधात ठराव मंजूर करण्यात आला.

महाराष्ट्र विधानसभेत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाशी संबंधित चित्रपटाचा निषेध करण्यात आला आहे.

ब्रिटनची मीडिया संस्था - BBC ने एक डॉक्युमेंट्री बनवली होती. यामध्ये २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या हिंसाचार आणि दंगलीच्या वेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते आणि सुमारे २०-२१ वर्षे जुन्या घटनांचा उल्लेख आहे.

२००२ मध्ये गोध्रा येथे ट्रेन जाळल्यानंतर दंगल उसळली होती. त्यावेळी तत्कालीन राज्य सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले होते. नरेंद्र मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते, दंगलीच्या वेळी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून बीबीसीने एक डॉक्युमेंट्री बनवली, त्यावर भारत सरकारने हा अपप्रचार असल्याचे सांगत बीबीसीने केवळ एक बाजू दाखवल्याचे म्हटले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT