Sanjay-Raut 
महाराष्ट्र बातम्या

छत्रपतींच्या प्रत्येक गादीविषयी आदर, भाजपने माफी मागावी : संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. तसेच आम्हाला शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गादीविषयी आदर असल्याचे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पुण्यात बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे उदयनराजे भोसले यांनी दाखवून द्यावे,'' असे म्हणत थेट आव्हान दिले होते. शिवाजी महाराज हे कोणाच्या कुटुंबाचे नाही तर, अवघ्या राज्याचे दैवत आहे, असेही राऊत यांनी म्हटले होते. दरम्यान, शिवाजी महाराज यांच्या वंशजाबाबत राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद जोरदार उमटण्यास सुरवात झाली आहे. भाजप नेत्यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत यांनी या टीकांनी ट्विट करून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. छत्रपतींची प्रत्येक गादी विषयी आम्हाला आदर आहे. पण छत्रपती ऊदयन राजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला. हा शिवरायांच्या वंशजांचा अपमान आहे. त्याबद्दल भाजप शिवरायांच्या वंशजांची व महाराष्ट्राची माफी मागेल काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: कच्चे तेल पुन्हा महागले! 8 जुलैचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; पाहा तुमच्या शहरातील भाव

Pune: पालखी सोहळा मुक्कामाची तयारी पूर्ण; भवानी पेठ आणि नाना पेठेतील विठ्ठल मंदिरे सज्ज

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेची बदलापूर ते मुंबई रेल्वे सेवा धिम्या गतीने सुरु

Pune: तिसऱ्या दिवशीही रस्त्यांवर पाणी; महापालिकेची यंत्रणा अपयशी; वारकऱ्यांना अडचणींचा सामना

Aashadhi Wari: मुख्यमंत्र्यांच्या आवाहनालाही वारकऱ्यांचा नम्र नकार! ‘वारी आळंदीतूनच’ म्हणत दोन लाख भाविक ठाम

SCROLL FOR NEXT