Chhagan Bhujbal esakal
महाराष्ट्र बातम्या

नाशिक : महाराष्ट्रदिनी पालकमंत्र्यांच्या राजकीय भाषणावर निर्बंध

राज्य सरकारने महाराष्ट्रदिनाच्या सोहळ्याची रूपरेषा स्पष्ट केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यातील सध्याच्या राजकीय गदारोळाच्या पार्श्‍वभूमीवर आज राज्य सरकारने महाराष्ट्रदिनाच्या सोहळ्याची रूपरेषा स्पष्ट केली आहे. त्यानुसार पालकमंत्र्यांनी कोणतेही राजकीय भाषण करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या भाषणाचा आशय ऐतिहासिक पार्श्‍वभूमी, ऐतिहासिक मान्यवरांचे कार्य आणि कर्तृत्व या पुरते मर्यादित असेल. बलिदान केलेल्या हुतात्म्यांचा आणि देशाचा गौरव याचाही भाषणात सरकारला समावेश अपेक्षित आहे. (Restrictions on Guardian Minister's political speech on Maharashtra Day)

सर्वत्र सकाळी आठला ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त एक मेस सकाळी सातला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि इतर हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करतील. त्यानंतर सकाळी आठला शिवाजी पार्कमध्ये ध्वजारोहण आणि संचलन होईल. तसेच सकाळी आठला विभागीय, जिल्हा, उपविभागीय व तहसिल मुख्यालयासह इतर ठिकाणी सकाळी आठला ध्वजारोहण आणि संयुक्त संचलन होईल. त्यामुळे सकाळी सव्वासात ते नऊ या वेळेत ध्वजारोहणाचा अथवा इतर कोणताही सरकारी अथवा निमसरकारी कार्यक्रम होणार नाही. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचे ध्वजारोहण करायचे असल्यास अशांनी सकाळी सव्वासात पूर्वी अथवा नऊ नंतर करायचे आहे. विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्री, तालुक्याच्या ठिकाणी विधानसभा अथवा विधानपरिषद सदस्य ध्वजारोहण करतील. महाराष्ट्रदिनी राज्यात सर्वत्र व खेड्यातील सार्वजनिक आणि सरकारी इमारतींवर आणि रायगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, वसई, प्रतापगड, दौलताबाद, सीताबर्डी, चंद्रपूर अशा ऐतिहासिक ठिकाणी राष्ट्रध्वज उभारायचा आहे. सूर्यास्तास राष्ट्रध्वज उतरवण्यात येईल.

राज्य सरकारच्या सूचना

० कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करू नये
० स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या पत्नी व आई-वडिलांना आणि कोरोना योद्ध्यांना निमंत्रित करावे
० कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक अंतर राखून नियमांचे पालन करावे
० राष्ट्रध्वजाला वंदन करताना ‘जन-गण-मन' हे राष्ट्रगीत वाजविण्यात यावे
० कोणत्याही अधिकाऱ्यांनी भाषण करू नये
० सलामीवेळी सज्ज असलेला बँड सलामीपूर्वी आणि सलामीनंतर वाजवावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकारच्या GR ला विरोध करणारे मराठे कोण? मनोज जरांगेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं

Latest Maharashtra News Updates : आगामी महापालिका निवडणुकांसाठी सोलापूर महानगरपालिकेकडून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध

स्वदेशी अॅक्शन, दमदार भावनेने भरलेले आणि पुरेपूर मनोरंजन असणाऱ्या अनुराग कश्यप यांच्या निशानची चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

'आम्हाला माहितीये, शिंदेसाहेब तुमच्यावर ताण पडतो, तेव्हा तुम्ही दरे गावात जाता'; मराठा आरक्षणावरुन ॲड. सदावर्तेंचा निशाणा

Ganesh Visarjan 2025: 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...' गणपती विसर्जन करताना 'या' चुका टाळा, बाप्पाला द्या योग्य निरोप

SCROLL FOR NEXT