crime esakal
महाराष्ट्र बातम्या

भर मिटिंग मध्ये निवृत्त जवानाच्या पत्नीचा विनयभंग, डोंबिवली मध्ये घडली धक्कादायक घटना

काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये भररस्त्यात शाळकरी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला होता.

सकाळ डिजिटल टीम

Dombivali news: कल्याण डोंबिवलीमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहे. अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, महिलेवर 15 जणांच्या टोळक्याने केलेला हल्ला या घटना ताज्या असतानाच आणखी एक घटना डोंबिवलीत घडली आहे.

सोसायटीच्या बैठकीत सीआरपीएफ दलातील निवृत्त जवानाच्या पत्नीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात महेश ठोंबरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश हा एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने अद्याप पोलिसांनी त्याला अटक केली नसल्याचे बोलले जात आहे. या घटनेवरून कल्याण डोंबिवली मध्ये महिला सुरक्षित नसल्याचे बोलले जात आहे.

डोंबिवली पूर्वेतील काऊन तळोजा परिसरात ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे. शनिवारी दुपारी

सोसायटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महेश यांचे एका महिलेसोबत भांडण झाले. या भांडणात निवृत्त जवान यांच्या पत्नीने त्या महिलेची बाजू घेतली. याचा राग आल्याने महेश यांनी पीडित महिलेशी स्त्री मनास लज्जा येईल अशा अर्वाच्य भाषेत बोलत हातवारे केले. (Latest marathi News)

या बैठकीत काही नागरिकांनी महेश याला संबंधित महिलेची माफी मागण्यास सांगितले. मात्र त्याने माफी न मागता पुन्हा शिवीगाळ केला असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा मानपाडा पोलीस ठाण्यात महेश याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. महेश हा एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने त्याच्यावर अद्याप कारवाई केली गेली नसल्याचे बोलले जात आहे. (Latest marathi News)

मात्र, सुशिक्षितांच्या डोंबिवलीत भारतीय निवृत्त सैनिकाच्या महिलेचा विनयभंग झाल्याने सध्या एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT