Lok Sabha Election 2024 esakal
महाराष्ट्र बातम्या

Lok Sabha Election 2024: लोकसभेची जबाबदारी स्वीकारतो म्हणत, शिवसेनेच्या खासदाराची भाजपने उचचली जबाबदारी

विखेंनी घेतली खासदार लोखंडेंची जबाबदारी

रुपेश नामदास

शिर्डी: खासदार सदाशिव लोखंडे यांनी चिंता करू नये. आजवर जो शिर्डीच्या सहवासात आला, त्याचे कल्याण झाले, अशा शब्दांत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोखंडे यांना सबुरीचा सल्ला दिला. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत तुमची जबाबदारी स्वीकारत असल्याचा शब्द दिला.

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निळवंडे धरणाच्या मुखाजवळील कालव्याचे काम मार्गी लावण्याचे श्रेय विखे पाटील आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांना दिले. गेल्या काही दिवसांत या कालव्याच्या चाचणीवरून श्रेयवाद सुरू होता. या पार्श्वभूमीवर या दोन दिग्गज नेत्यांची आजची ही विधाने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

निळवंडे डाव्या कालव्याची चाचणी आज (बुधवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या कार्यक्रमात फडणवीस यांनी निळवंडे कालव्याच्या मुखाजवळील काम मार्गी लावण्याचे श्रेय विखे पाटील आणि पिचडांना दिले.

तसेच लोखंडे यांनीही त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगत त्यांच्या प्रयत्नांची देखील दखल घेतली. फडणवीस म्हणाले की, पहिल्या वीस किलोमीटर अंतरातील कालव्यांची कामे ठप्प होती. विखे पाटील विरोधी पक्षनेते होते.

मी त्यांना पोलिस संरक्षणात ही कामे करणार असल्याचे सांगीतले. त्यावर ते म्हणाले पिचडांना विश्वासात घेऊन आपण हे काम करू शकतो. विखे पाटलांनी पुढाकार घेतला आणि पिचडांनी त्यासाठी मोठे सहकार्य केले.

विखे पाटील म्हणाले की, धरणाच्या मुखाशी कामे बंद आणि आंदोलने मात्र आमच्याकडे व्हायची. पिचडांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्यामुळेच मुखाजवळील कालव्याचे काम मार्गी लागले. खूप काही बोलता येईल. मात्र आजचा दिवस आनंदाचा, कोण काय बोलतो, याकडे काहींचे लक्ष असते. त्यात रस घेऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकरांना मोठा दिलासा! १५ ते २४ जूनदरम्यान जड वाहनांना नो-एंट्री; ट्रॅफिक कोंडीवर प्रशासनाचा मोठा निर्णय

Fifa World Cup : चोरांचा इंग्लंडच्या ट्रेनिंग किटवर डल्ला... खेळाडूंचा सराव सुरू होण्यापूर्वी व्हॅनमधून सामान पळवले, फक्त एक चेंडू ठेवला...

राजघराण्यात वादातून रक्तरंजित थरार, पहिल्या पत्नीवर दुसऱ्या पत्नीने झाडली गोळी

MPSC Success Story: वयाच्या ७व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले! जिद्दीच्या जोरावर अजय यलगंदकर बनले PSI; आईच्या कष्टाचे चीज केलं, संघर्षाला यशाची किनार..

NEET मध्ये अपयश, मग बनला फेक ब्रिगेडियर; दोन कमांडो, खांद्यावर स्टार्स, गाडीवर झेंडा... 21 वर्षीय तरुणाचा धक्कादायक कारनामा!

SCROLL FOR NEXT