MP Sanjay Raut MP Sanjay Raut
महाराष्ट्र बातम्या

मुंबईतल्या धनवान लोकांनो, आता पूरग्रस्तांना मदत करा- संजय राऊत

मुंबईतल्या धनवान लोकांनो, आता पूरग्रस्तांना मदत करा- संजय राऊत "मुंबई आणि महाराष्ट्राने अनेक लोकांना श्रीमंत केलंय" Rich Mumbaikars should come forward and help Flood Affected people suggests Sanjay Raut

विराज भागवत
  • "मुंबई आणि महाराष्ट्राने अनेक लोकांना श्रीमंत केलंय"

मुंबई: गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली आहे. या जिल्ह्यांमध्ये अनेक बळी गेलेत. त्यामुळे आता या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न सुरू आहे. असे असतानाच मुंबईतील धनवान लोकांनी पूरग्रस्त नागरिकांसाठी सढळ हस्ते मदत करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊतांनी केले.

"महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती आहे. लाखो लोक बेघर झालेले आहेत. मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे जीव गेलेत आणि त्यांची कुटुंब उध्वस्त झाली आहेत. त्या सगळ्यांना आता सावरणं जास्त गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकार मदतीसाठी पूर्ण प्रयत्न करत आहे पण केंद्र सरकारला सुद्धा जास्तीत जास्त मदत महाराष्ट्राला करावी लागेल. तसेच मुंबई शहरात अनेक धनवान लोक आहेत. त्यांनीसुद्धा जास्त लक्ष महाराष्ट्राकडे द्यावं", असे राऊत म्हणाले.

"महाड, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे गावं उध्वस्त झाली. त्या गावांना आता पुन्हा एकदा उभं करावं लागेल. सरकारचा आपल्याकडून पूर्ण प्रयत्न करत आहे. राज्य सरकार पूर्ण सर्वतोपरी प्रयत्न करेल हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. पण ही सगळ्यांची जबाबदारी आहे. महाराष्ट्राने ज्याला कोणाला दिले, त्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे महाराष्ट्राला उभं करायची त्यांची जबाबदारी आहे. राज्याला सहस्त्र हातांनी मदत होणे आवश्यक आहे. केंद्र मदत करते. ते चांगली मदत करत आहेत. जागतिक श्रीमंतांच्या यादीमध्ये मुंबईचे अनेक जण आहेत त्यांनी सुद्धा मदत करायला हवी", असे ते म्हणाले.

"भास्कर जाधव यांच्याबाबत काय झालं ते मी पाहिलं नाही. वृत्तपत्रांमध्ये वाचलं आहे. त्यामुळे त्या सगळ्यावर तेच बोलतील. पण या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संयम ठेवणे गरजेचे आहे. लोकांचा आक्रोश वेदना समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि मुख्यमंत्री आणि सरकार हे करत आहे", असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Dividend Stocks: Oil India, Coal India सह या 46 शेअर्सकडे ठेवा लक्ष! डिव्हिडंड आणि बोनसमुळे चर्चेत; मोठा फायदा होण्याची शक्यता

२ अभिनेत्रींसोबत अफेअर, रंगेहात पकडले गेले तरीही नाना पाटेकरांच्या पत्नीने का नाही दिला घटस्फोट?

Latest Marathi News Update : जळगावमध्ये सोने-चांदीच्या दरात घसरण; जीएसटीसह सोने 1.60 लाखांवर

Rajpal Yadav Granted Interim Bail: राजपाल यादवला ‘चेक बाउन्स’ प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर, मात्र....

SCROLL FOR NEXT