Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: विठ्ठल दर्शनाला निघालेल्या पवारांकडे राष्ट्रवादीच्या नाराजांचे गाऱ्हाणे, विधानसभा निवडणुकीवेळी...

विधानसभा निवडणुकीवेळी योग्य निर्णय होणार; भगीरथ भालकेसह नाराज मंडळींनी घेतली शरद पवारांची भेट

सकाळ डिजिटल टीम

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्याचे संकेत काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. त्यानंतर आज (सोमवारी) विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी त्यांची भूमिका मांडली.

विधानसभा निवडणुकीला आणखी वर्षाहून अधिक काळ आहे. आपण लोकांच्या सोबत राहून अखंड काम करत आहोत. देशाचे नेते असलेले श्री. पवार हे जनतेच्या मनातील ओळखून निर्णय घेणारे नेते असल्याने विधानसभा निवडणुकी वेळी ते योग्य निर्णय घेतील, असा विश्वास भगीरथ भालके यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काल (ता. ७) गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आले होते. त्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी कल्याणराव काळे, भगीरथ भालके, युवराज पाटील, ॲड. गणेश पाटील यांना निमंत्रित केले नव्हते.

कार्यक्रम झाल्यावर श्री. पवार हे श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जाताना रस्त्यावर नाराज मंडळींनी श्री. पवार यांचे स्वागत केले. या पार्श्वभूमीवर काळे, भगीरथ भालके, युवराज पाटील, ॲड. गणेश पाटील यांनी आज (सोमवारी) सकाळी सोलापुरात श्री. पवार यांची भेट घेतली.

दरम्यान, अभिजित पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भगीरथ भालके यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांची भूमिका मांडली. ते म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जणू उमेदवारीचा एबी फॉर्मच पवार साहेबांनी कोणाला तरी दिला, अशा पद्धतीचे चित्र काही मंडळींकडून उभा केले जात आहे, दिशाभूल केली जात आहे. श्री. पवार जनतेचा विचार करूनच निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भालके पुढे म्हणाले, आम्ही सोलापुरात श्री. पवार यांची भेट घेतली. पंढरपूर येथील कॉरिडॉरचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणींसह पंढरपूर तालुक्यातील राजकीय, सामाजिक प्रश्न आणि अडचणींच्या संदर्भात चर्चा झाली. या अडचणी सोडवण्यासाठी पाठीशी राहू आणि विठ्ठल परिवार एकसंध ठेवण्यासाठी सर्वांना बोलावून मार्ग काढू, असे श्री. पवार यांनी सांगितले आहे.

आम्ही पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील सर्व गावांतील लोकांशी सतत संपर्कात आहोत. दररोज दोन्ही तालुक्यांतील लोकांच्या भेटीगाठी घेण्याचे काम अखंडपणे सुरू आहे. लोकांना शक्य असेल ती मदत करत आहोत. काही विरोधी मंडळी आपल्याविषयी गैरसमज पसरवत आहेत. परंतु (कै.) भारतनानांनी ज्या पद्धतीने लोकांमध्ये राहून काम केले, त्याच पद्धतीने आपलेही काम सुरू आहे. भविष्यातही आपण आणखी जोमाने काम करत राहू.

श्री. पवार यांच्या भेटीसंदर्भात कल्याणराव काळे यांना विचारले असता ते म्हणाले, एकाच पक्षात असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि साखर कारखान्याच्या निवडणुकांच्या संदर्भात एकमेकांच्या विरोधी भूमिका घेण्यामुळे मतभेद वाढत असल्याचे आम्ही श्री. पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनीही एकमेकांच्या संस्थेत हस्तक्षेप करणे योग्य नाही, असे मत व्यक्त करून दोन दिवसांत मुंबईत आमच्या सर्वांची बैठक घेऊन मार्ग काढू असे सांगितले आहे.

भगीरथ भालके - नाना पटोले भेट

भगीरथ भालके यांनी आज दुपारी पंढरपुरात कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना श्री. पटोले म्हणाले, माजी आमदार (कै.) भारत भालके यांनी अनेक वर्षे विधानसभेत आपल्या सोबत काम केले.

मी विधानसभा अध्यक्ष होतो तेव्हा त्यांचे निधन झाले. त्यानंतर आपण त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आलो होतो. माझी भगीरथ भालके यांची भेट राजकारणासाठी झालेली नाही. (कै.) भालके यांच्यानंतर त्यांच्या परिवारावर आलेल्या संकटातून बाहेर काढण्याचे काम कॉँग्रेस पक्ष करेल. भगीरथ भालके यांनी कॉँग्रेसमध्ये यायचे की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे, असे श्री. पटोले यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT