Shivaji Maharaj esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivaji Maharaj: 2024मध्ये जगदंबा तलवार महाराष्ट्रात येणार? राज्य सरकारचे प्रयत्न सुरू

संतोष कानडे

मुंबईः महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष असणारी जगदंबा तलवार महाराष्ट्रात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडे सरकारने पाठपुरावा सुरु केला आहे.

राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत बोलतांना सांगितलं की, २०२४मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतिनशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचा आराखडा करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार इंग्लंडकडून मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आलेले आहेत. तसं झालं तर ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब ठरणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.

दरम्यान, १८७५-७६मध्ये ही तलवार इंग्लंडला गेल्याचं सांगितलं जातं. इंग्लंडचे प्रिन्स भारतात आल्यानंतर त्यांना काही भेटवस्तू देण्यात आल्या. त्यामध्ये जगदंबा तलवारदेखील भेट देण्यात आली होती. ही तलवार मिळावी, यासाठी अनेकवेळा आंदोलनं झाली.

मात्र आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे पंतप्रधान झाल्याने त्यांच्याशी बोलणी सुरु झाली आहे. राज्य सरकारने केंद्रामार्फत जगदंबा तलवार महाराष्ट्राला देण्याची मागणी केल्याचं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 3rd ODI: 'चेस मास्टर' विराट कोहली लढला अन् विश्वविक्रमी सेंच्युरीही ठोकली; मालिका विजयासाठी भारताच्या आशा जिवंत

Mumbai Firing Incident : मोठी बातमी! मुंबईत गोळीबाराची घटना, सोसायटीवर फायरींग करत आरोपी फरार

Pune Political Shift : शरद बुट्टेपाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार; उत्तर पुण्यात भाजपला मोठा धक्का!

Haveli Taluka Elections : हवेली तालुक्यात निवडणुकीत बदलती समीकरणे; विकास की देवदर्शन?

IND vs NZ, 3rd ODI: विराट कोहलीच्या अर्धशतकाआधीच न्यूझीलंडच्या कर्णधाराने अचानक का सोडलं मैदान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT