Rohit Pawar And Chandrakant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं, रोहित पवारांचा पाटलांना सवाल

म्हणूनच राजकारणी व यशस्वी गृहिणी असलेल्या सुप्रियाताईंबद्दल त्यांचा राग असावा !

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले. तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाहीतर मसणात जा या शब्दांमध्ये पाटील यांनी सुळे यांच्यावर टीका केली. त्याचा समाचार आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज गुरुवारी (ता.२६) ट्विट करुन घेतला. ते म्हणतात, गृहिणींचा अभिमान असावा, पण भाजप नेत्यांकडून महिलांचा नेहमीच द्वेष केला जातो आणि चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्यही याच द्वेषातून आलेलं आहे. (Rohit Pawar Attack On Chandrakant Patil For Comment On Supriya Sule)

म्हणूनच राजकारणी व यशस्वी गृहिणी असलेल्या सुप्रियाताईंबद्दल त्यांचा राग असावा, असा टोला त्यांनी पाटलांना लगावला. पण गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं, असा सवाल रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना केला.

प्रकरण काय आहे?

दिल्लीत कोणाच्या बैठकानंतर मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण देण्याबाबत निकाल लागला, असा सवाल ओबीसी आरक्षणावरुन सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला होता. आपण याबाबत केंद्र सरकारला विचारणार असल्याचे त्या म्हणाल्या. यावर चंद्रकांत पाटील यांना प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी बेताल वक्तव्य केले. तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाहीतर मसणात जा, असे वादग्रस्त विधान त्यांनी सुळेंना उद्देशून केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT