रोहित पवार. esakal
महाराष्ट्र बातम्या

गप्प बसणारे भाजप नेते चढाओढीने मुख्यमंत्र्यांवर टीका करतात - रोहित पवार

'तौक्ते वादळाच्या वेळेस पंतप्रधानांनी शेजारच्या राज्याची पाहणी करून त्यांना तातडीने हजार कोटी रुपयांची मदत केली आणि त्याचवेळी महाराष्ट्राला मात्र सापत्न वागणूक दिली.'

गणेश पिटेकर

पुणे : मंत्र्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसणं, या संस्कृतीची भाजपच्या नेत्यांना सवय आहे. पण पंतप्रधानाच्या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री हजर असताना, मुख्यमंत्री का उपस्थित राहिले नाहीत अशी टीका करणाऱ्या या नेत्यांनी हे केंद्राचं नाही तर महाराष्ट्राचं सरकार (Maharashtra Government) आहे, हे लक्षात घ्यावं, असा टोला आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपच्या नेत्यांना आज लगावला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतात, की तौक्ते वादळाच्या वेळेस आदरणीय पंतप्रधानांनी शेजारच्या राज्याची पाहणी करून त्यांना तातडीने हजार कोटी रुपयांची मदत केली आणि त्याचवेळी महाराष्ट्राला मात्र सापत्न वागणूक दिली.(Rohit Pawar Criticize BJP Leaders For Attacking Chief Minister Uddhav Thackeray)

त्यावेळी मूग गिळून गप्प बसणारे भाजप (BJP) नेते आज मात्र चढाओढीने मुख्यमंत्र्यांवर टीका करतात, हे आश्चर्यकारक आहे. केवळ केंद्रीय नेतृत्वाला खूष करून त्यांची मर्जी सांभाळण्याची राजकीय भूमिका भाजपच्या नेत्यांकडून नेहमीच घेतली जाते, अशी टीका रोहित पवार यांनी केली. पण या राज्याचे आपण देणे लागतो, या भूमिकेतून कधी तरी राज्याच्या हिताची भूमिका घेण्याचं शहाणपण ज्या दिवशी त्यांना येईल, तो राज्यासाठी सुदिन असेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर कोरोना स्थितीवर बैठक घेतली होती. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. त्याऐवजी आरोग्य मंत्री राजेश टोपे हे उपस्थित होते. यावरुन सध्या भाजपकडून राजकारण केले जात आहे. काहींनी तर आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : चंदा चोर, चंदा चोर! लोकसभेत विरोधकांची घोषणाबाजी, अमित शहांना चर्चेला बोलवण्याची मागणी

Tata Sons N Chandrasekaran : टाटा समूहाला मोठा धक्का? चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर्स गडगडले, TCS मध्ये मोठी घसरण

हातात पिशव्या, पायात चप्पलही नाही... लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळाली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

नाना पाटेकरांचं खरं नाव वेगळंच! मग हे नाव कसं पडलं? नानांनी सांगितला किस्सा

Satara Road Condition: खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला, मुसळधार पावसाने रस्त्यांची अवस्था बिकट; सणासुदीपूर्वी डागडुजीचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT