MLA Rohit Pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार? ग्रीन एकर कंपनीची 'ईडी'कडून चौकशी सुरू

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राज्यातील अनेक नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमीरा लागलेला आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक दोघेंही सध्या कारागृहात असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील कारागृहात आहेत. त्यातच आता ईडीच्या रडारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार हे देखील आल्याचं दिसून येत आहे. रोहित पवार कधीकाळी संचालक असलेल्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे. (Rohit Pawar News in Marathi)

ईडीकडून रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची प्राथमिक चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. रोहित पवार यांच्यासह राकेश वाधवान हे देखील कंपनीच्या संचालकपदी होते.

काही दिवसांपूर्वी ईडीला तक्रार मिळाली होती. त्यामध्ये रोहित पवार यांचे राकेश वाधवान यांच्याशी जवळचे संबंध असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. २००६ ते २०१२ या कालावधीत रोहित पवार यांनी ग्रीन एकर रिसॉर्ट आणि रिअल टच प्रा. लिमिटेडचे संचालक होते. त्यात त्यांनी गुंतवणूक केली होती. त्यात रोहित पवार यांच्यासह चार लोकांची नावं होती. लखविंदर दयालसिंग, धोंडूराम जैदर, अरविंद परशूराम पटेल हे आहेत. यापैकी लखविंदर दयालसिंग हे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांचे अत्यंत जवळचे आहेत. लखविंदर हे एचडीआयएल, हार्मनी मॉल्ससह ११ ते १२ कंपनीमध्ये राकेश वाधवान यांच्यासोबत पार्टनर होते. ग्रीन एकर्स प्रा.लि. कंपनीमुळे रोहित पवार आणि लखविंदर यांचे संबंध होते. या कंपनीच्या माध्यमातून मोठी रक्कम देशाबाहेर पाठविण्यात आली, तसेच देशात आली, याची चौकशी व्हावी, अशी तक्रार ईडीला प्राप्त झाली होती.

या तक्रारीवर ईडीकडून चौकशी करण्यात येत असून प्राथमिक तपास सुरू झाला आहे. रोहित पवार यांचे वाधवान यांच्याशी संबंध आहेत, का हेही तपासले जात असल्याचं सांगण्यात येत आहे. कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची माहिती कंपनीने लपवून ठेवल्याचेही आरोप आहेत.

राजकीय सुडापोटी नाव अडकविण्याचा प्रयत्न - महेश तपासे

रोहित पवार संचालक असलेल्या कंपनीच्या चौकशीच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवत राजकीय सुडापोटी नाव अडकविण्यात येत असल्याचं म्हटलं. ईडीचा वापर राजकीय विरोधकांसाठी केला जात आहे. रोहित पवार कंपनीचे संचालक देखील नाहीत. केवळ महागाई आणि बेरोजगारीवरून भाजपविरोधात बोलत असल्याने ईडीच्या फेऱ्यात अडकवले जात असल्याचा आरोप तपासे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT