rohit pawar on bageshwar dham dhirendra shastri controversial statement about sant tukaram maharaj  
महाराष्ट्र बातम्या

Direndra Shastri : "बागेश्वर बाबाने संत तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली..."; रोहित पवार संतापले!

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून त्यांच्या चमत्काराच्या मुद्द्यावरुन चांगलेच चर्चेत असलेले बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. बागेश्वर महाराज यांचा वादग्रस्त व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये बागेश्वर महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.यावरून आता नवा वाद पेटला आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला आहे.

संत तुकाराम महाराज यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची, असा दावा धीरेंद्र कृष्ण महाराजांनी केला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

"बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते मात्र शांत आहेत… या बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलं महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही." अशा शब्दात रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

रोहित पवार यांनी "अशा माणसाला सरकारने तुकोबारायांच्याच शब्दांत उत्तर द्यावं…तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजरा!" असे अवाहन देखील यावेळी केलं आहे.

बागेश्वर बाबा नेमकं काय म्हणाले..?

"महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज यांना त्यांच्या पत्नी रोज मारत असत. त्यांना रोज काठीने मारत होते. यावेळी त्यांना कोणीतरी विचारले तुम्हाला पत्नी मारते, तुम्हाला काहीच वाटत नाही का. तर तुकाराम महाराज म्हणाले, देवाची कृपा आहे की मला मारणारी पत्नी मिळाली. प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. पत्नीच्या चक्करमध्ये पडलो असतो. पण मारणारी पत्नी मिळाली तर मला संधी मिळाली देवावर प्रेम करण्याची," असे वादग्रस्त विधान बागेश्वर महाराजांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बागेश्वर महाराजचा जाहीर निषेध झाला पाहीजे. असं बोलणे चुकीचे आहे. चांगले भारतीय संस्कार आहेत म्हणून लोक आध्यात्माकडे वळतात. तुकाराम महाराजांवरील वक्तव्याचा सर्व समाजातून निषेध झाला पाहिजे.दरम्यान या विधानानंतर राज्य सरकारकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT