Rohit Pawar  Sakal
महाराष्ट्र बातम्या

"मनसेने राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी"; रोहित पवारांचा टोला

मनसेने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित करण्याबद्दल जबाबदार धरलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित झाल्याप्रकरणी मनसेने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मधे आणलं आहे. अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यासोबतचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबतचा फोटो मनसेने शेअर केला आहे. याच प्रकरणावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मनसेला सुनावलं आहे. (MNS Shared photos of Sharad Pawar with Brijbhushan singh)

रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. रोहित पवार म्हणाले, "राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय तरी मनसेला हे कसं कळत नसेल? खासदार बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये.

शरद पवारांच्या फोटोबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले, "शरद पवार साहेब (NCP Chief Sharad Pawar) आणि खासदार बृजभूषण सिंह यांच्या एकत्रित फोटोचा....तर पवार साहेब हे अनेक वर्षे 'महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे'चे अध्यक्ष आहेत आणि खासदार बृजभूषण सिंह हे 'भारतीय कुस्ती संघा'चे अध्यक्ष आहेत. मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळं संभाव्य अपघात टळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: 'हा डेंजर संघ आहे...' Dhoni सूर्याच्या टीम इंडियाबद्दल स्पष्टच बोलला; मनातील भीतीही सांगितली

Mamata Banerjee's Big Move: पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; ‘TMC’ने केली घोषणा!

Latest Marathi News Live Update : टेम्पोला धडकल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Manipur's New CM : युमनाम खेमचंद सिंह असणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री!, विधिमंडळ पक्षनेतेपदी झाली निवड

Horoscope News : 'या' राशींच्या अडचणीचा काळ झाला सुरु ! अंगारक योगामुळे करावा लागणार संकटांचा सामना

SCROLL FOR NEXT