Ramdas Athwale
Ramdas Athwale 
महाराष्ट्र

कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे मी पाहून घेतो, मला कॅबिनेट द्या : आठवले 

तात्या लांडगे

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला एकही जागा देऊ नका, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे मी पाहून घेतो, मात्र मला केंद्रात राज्यमंत्री नव्हे, तर कॅबिनेट द्या,'' अशी मागणी रिपाब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपकडे केल्याची चर्चा आहे. 

भाजपकडून माढा अथवा बारामतीतून उमेदवारी मिळण्याची शक्‍यता कमी असल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी परभणीतून लढविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचीही चर्चा आहे. दुसरीकडे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांची मात्र अडचण झाल्याचे चित्र असून, त्यांच्या रयतक्रांतीच्या पदरात यंदा एकही जागा पडल्याचे दिसत नाही. लोकसभा निवडणुकीचे अर्ज भरण्याला आता काही दिवसांचा अवधी शिल्लक असतानाही भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वच उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत. त्यामध्ये सोलापूर व माढा, परभणी, बारामती यांसह अन्य मतदारसंघांचा समावेश आहे. कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला तोडीस तोड देण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर केल्यानंतरच भाजप उमेदवार जाहीर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

...तर मी राष्ट्रवादीत जाईन 
"मी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला आहे. पंतप्रधान मला व्यक्‍तिश: ओळखतात. मी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात भेटी दिल्या असून, मला विजयाची खात्री आहे. त्यामुळे पक्षाकडे मला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली असून, मलाच उमेदवारी मिळणार,'' असे विद्यमान खासदार शरद बनसोडे म्हणत असल्याची चर्चा आहे. मात्र, भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मोहोळ विधानसभा लढविणार असून, तत्पूर्वी मी राष्ट्रवादीत प्रवेश करेन, असा इशाराही त्यांनी दिल्याने सोलापूरचा उमेदवार ठरविण्यास अडचणी येत असल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील मतदार 'विनाश'ला नव्हे तर 'विकास'ला मत देण्याइतपत हुशार आहेत; राऊतांना भाजप नेत्याचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT