RR Patil son Rohit Patil supports Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : आर. आर. पाटलांचे चिरंजीव रोहित पाटलांचा मोठा निर्णय; म्हणाले, शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा..

सर्वसामान्यांची नाळ पवार साहेबांशी जोडली गेल्यामुळे जोपर्यंत सर्वसामान्य माणूस आहे, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला काही फरक पडणार नाही.

हेमंत पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वसामान्यांसाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महिलांना आरक्षण देण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

कराड : सर्वसामान्यांची नाळ ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) साहेबांशी जोडली गेल्यामुळं जोपर्यंत सर्वसामान्य माणूस पक्षासोबत आहे, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला काही फरक पडणार नाही, असं स्पष्ट मत माजी उपमुख्यमंत्री कै. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी व्यक्त केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार हे कराड येथील ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दाखल होत आहेत. त्यासाठी रोहित पाटील कराडच्या प्रीतिसंगमावर आले असता, ते माध्यमांशी संवाद साधत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तळागाळापर्यंत घराघरापर्यंत पोचलेला पक्ष आहे. निश्चितपणे पक्ष सर्वसामान्यांच्या ताकदीवर पुन्हा उभा राहील. जे आमदार भाजप सोबत गेले आहेत, ते परत येतील की नाही याबाबत आत्ता सांगू शकत नाही. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रातील अनेक तरुणांचे आदर्श आहेत.

सर्वसामान्यांची नाळ पवार साहेबांशी जोडली गेल्यामुळे जोपर्यंत सर्वसामान्य माणूस आहे, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला काही फरक पडणार नाही. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही यापुढे वाटचाल करणार आहोत, असंही पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वसामान्यांसाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महिलांना आरक्षण देण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा उभा राहील, असंही रोहित पाटील यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT