Rupali Patil-Thombare esakal
महाराष्ट्र बातम्या

भाजपनं कुठं नेऊन ठेवलीय राजकारणाची पातळी? रुपाली पाटील संतापल्या

सकाळ डिजिटल टीम

महाविकास आघाडीतील नेत्यांनीही राणा दाम्पत्य आणि भाजपविरुध्द आक्रमक पवित्रा घेतलाय.

आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) हे दाम्पत्य सध्या राज्यभरात चर्चेत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हनुमान चालिसाबाबतच्या भूमिकेनंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याची आग्रही भूमिका मांडल्यानं आता राणा विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलाय.

उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांचे गुंड आमच्या घरी पाठवले आहेत. माझी पंतप्रधान मोदींना (Prime Minister Modi) विनंती आहे की, त्यांनी महाराष्ट्राकडं लक्ष द्यावं, असं विधान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलंय. दुपारी राणा यांनी आपली मोहीम मागे घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर मुंबईत शिवसैनिक (Shiv Sainik) आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. या प्रकरणानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनीही राणा दाम्पत्य आणि भाजपविरुध्द आक्रमक पवित्रा घेतलाय. या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी ट्विटव्दारे भाष्य करुन भाजपवर जोरदार टीका केलीय.

रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil-Thombre) यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, महाराष्ट्रात सत्ता नाही म्हणून, तडफडून महाविकास आघाडीवर केल्या जाणाऱ्या या ना त्या पद्धतच्या कुरघोड्या, रोज एक नवीन तमाशा करणारी पात्रं, अशी जय्यत तयारी भाजपनं केली असली तरी सत्तेसाठी काहीही करणारा पक्ष भाजपच आहे. भाजपनं कुठं नेहून ठेवलीय राजकारणाची पातळी हे महाराष्ट्र पाहतंच आहे, असा घणाघात त्यांनी भाजपवर केलाय. रुपाली पाटील यांनी राणा दाम्पत्याबाबतही हॅशटॅग दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : शिवसेना शिंदेंचीच अन् राष्ट्रवादी अजितदादांची! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर CM फडणवीसांचे भाकीत; राजकीय वर्तुळात चर्चा

IND vs SL 1st Test : बुमराहची अनुपस्थितीत, दोन गोलंदाजांपैकी निवडू कोणाला? शुभमन गिल पहिल्या सामन्यापूर्वी पेचात अडकला, म्हणाला...

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

अमिताभ बच्चन यांच्या ‘जुम्मा चुम्मा दे दे’ गाण्याने रातोरात स्टार झाली, कुटुंबासाठी सोडली इंडस्ट्री; आता कुठे आहे अभिनेत्री?

Marathi News Live Updates : शिवसेना अन् राष्ट्रवादी कुणाची? २०२४ च्या 'लोकन्यायालया'चा दाखला देत फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला

SCROLL FOR NEXT