Rupali patil thombare esakal
महाराष्ट्र बातम्या

राष्ट्रवादीचा नाम जप करू नका, रुपाली ठोंबरेंचा टिळकांच्या शैलीत बंडखोरांना टोला

धनश्री ओतारी

शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्न सातत्याने विचारला असता बंडखोर आमदार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधतात. बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादीवर याचं खापर फोडलं. तर अनेकांनी शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली असा आरोप केले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट करत बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला आहे.(rupali patil thombare criticized rebel mla sharad pawar)

राष्ट्रवादी राष्ट्रवादी नाम जप करू नका. आमचा आपल्या छल कपट केलेल्या उत्तराशी कोणताच संबंध नाही. तुम्ही केलेल्या पापी कृत्याचा उद्रेग तुमचे तुम्ही भोगा आमचे नाव घेऊ नये. असे सांगत आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत आम्ही टरफले उचलत नाही. लोकमान्य टिळकांच्या शैलीत रुपाली ठोंबरेंनी बंडखोरांना ट्विट करत चांलगच सुनावलं

काहीदिवसांपूर्वी, ''बंडखोरांच्या या वक्तव्यावर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनीदेखीव उत्तर देत बंडखोरांचा सवाल उपस्थित केला होता. आधी भाजपासोबत युतीत होतो तर भाजपा त्रास देतेय. भाजपा त्रास देत होती शिवसेनेला खोटं ठरवत होती. आपल्यासोबत ठरवलेल्या गोष्टीला नकार होता म्हणून महाविकास आघाडीला जन्म दिला तर काँग्रेस, राष्ट्रवादीवाले त्रास देत आहेत म्हणायला लागले, मग नेमकं तुम्हाला हवं तरी काय?” असा प्रश्न बंडखोराना ठाकरेंनी केला होता

शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर, सांगोल्याचे शहाजीबापू पाटील यांच्यासहीत रामदास कदम यांच्यासारख्या अनेक आजी-माजी नेत्यांनी निधीचा मुद्दा उपस्थित करण्याबरोबरच शरद पवारांनी शिवसेना संपवल्याचा आरोप केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: आदल्या दिवशी वाद; नंतर तलवार घेऊन तरुण हॉटेलमध्ये घुसला अन्... नवी मुंबईत मॅनेजरसोबत काय घडलं?

Pune Bangalore Highway Accident : देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला! पुणे–बंगळूर महामार्गालगत पिकअप पलटी; 11 भाविक जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

ग्लेन फिलिप्स फक्त मैदानातच उडत नाही, तर आकाशात विमानही उडवतो; स्वत:च शेअर केला Video

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

SCROLL FOR NEXT