rupali thombre patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Shewale: “स्वत: शेण खाता अन् ....शेवाळेंच्या दाव्यानंतर रुपाली ठोंबरे संतापल्या

लैंगिक अत्याचार आरोप करणाऱ्या महिलेचे पाकिस्तानाशी संबध असल्याचा खळबळजनक दावा राहुल शेवाळे यांनी केला.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेच्या गंभीर आरोपानंतर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत. संसार आणि राजकीय आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत लैंगिक अत्याचार आरोप करणाऱ्या महिलेचे पाकिस्तानाशी संबध असल्याचा खळबळजनक दावा केला. त्यांच्या या दाव्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. (Rupali patil Thombre Rahul Shewale Pakistan Dawood Ibrahim Uddhav Thackeray)

शेवाळे यांच्या पत्रकार परिषदेनंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. राहुल शेवाळे स्वत: शेण खातात आणि त्या महिलेचा दाऊदशी संबंध जोडतात. राहुल शेवाळे यांना असं बोलताना लाज वाटली पाहिजे. असा शब्दात ठोंबरे पाटील यांनी शेवाळे यांना फटकारले आहे.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे शिवसेनेच्या रडारवर आले आहेत. शेवाळे यांच्या विरोधात एका महिलेनं केलेल्या लैंगिक अत्याचार व मानसिक छळाच्या तक्रारीची दखल घ्यावी व या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनेनं केली. शिवसेनेच्या या मागणीनंतर राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत.

या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. माझा संसार आणि राजकीय आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत त्या महिलेचे पाकिस्तानाशी संबध असल्याचा खळबळजनक दावाही शेवाळे यांनी केला.

काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे?

राहुल शेवाळे स्वत: शेण खातात आणि त्या महिलेचा दाऊदशी संबंध जोडतात. राहुल शेवाळे यांना असं बोलताना लाज वाटली पाहिजे. राहुल शेवाळे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या जीवाला धोका आहे.

एकीकडे राहुल शेवाळे म्हणतात की या महिलेचा दाऊदशी संबंध आहे. तर मग राहुल शेवाळे आणि या महिलेचे जवळचे संबंध होते. अगदी वरचेवर बोलणं व्हायचं याचा अर्थ राहुल शेवाळे यांनी दाऊदतच्या हस्तकाशी संबंध ठेवले आणि तिला देशातील अंतर्गत माहिती पुरवली, असा अर्थ घ्यायचा का?, असा सवालही उपस्थित केला.

Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

शेवाळे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचा दाऊदशी संबंध नाही. पण जर शेवाळे तसा आरोप करत असतील तर शेवाळेंनी देशाच्या विरोधात काम केलं, असं म्हणत शेवाळेंवरच कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी ठोंबरे पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT