Rutuja 
महाराष्ट्र बातम्या

Andheri Bypolls Election: अडथळ्याची शर्यत जिंकत ऋतुजा लटकेंनी उघडलं ठाकरे गटाचं खातं

राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात काही दिवसांपासून राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके ६६२४७ इतक्या मतांनी विजयी झाल्या आहेत.तर नोटाला १२७७६ इतकी मत मिळाली आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही निवडणूक अटीतटीची ठरली आहे. अवघ्या राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना 90 ते 95 टक्के मतं मिळतील, असा अंदाजही व्यक्त केला होता. दरम्यान, ऋतुजा लटके पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातही जास्त मतांनी विजयी ठरल्या.

राज्यातील सत्तांतरानंतर मुंबईत होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत ठाकरे गटाला आपले वर्चस्व दाखवून देण्यासाठी ऋतुजा लटके याचा विजय आवश्यक होता. आज सकाळी 8 वाजता टपाली मतमोजणीस सुरवात झाली होती. भाजपच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली. त्यामुळे मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या तीन ते चार तासांमध्येच निकाल स्पष्ट होईल, असा राजकीय जाणकारांनी अंदाज व्यक्त केला होता.

मतदारांच्या निरुउत्साहामुळे निवडणुकीत अवघे 31.74 टक्के इतके मतदान झाले होते. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व मतदारसंघात एकूण 2,71,000 मतदार आहेत. मात्र, यापैकी फक्त 31.74 टक्के म्हणजे 85,698 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे निकालाच्या दिवशी कसं चित्र असेल, याविषयीचा संभ्रम वाढला होता.

भाजपच्या मुरजी पटेल यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. त्यामुळे ही पोटनिवडणूक एकतर्फी झाली. यामध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु, मतदानाच्या काही दिवस आधी भाजपकडून पडद्यामागून 'नोटा'चा प्रचार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. ऋतुजा लटके यांच्यापेक्षा नोटा या पर्यायाला जास्त मतं पडावीत, यासाठी पद्धतशीर आखणी केली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे होते. परंतु ऋतुजा लटके यांच्यानंतर ची दुसरी जास्त मते नोटाला मिळण्याच यावेळी दिसून आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT