CM eknath shinde  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: 'खुर्चीखाली धमाका झाल्याशिवाय राहणार नाही' सामनातून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

सत्तांतरातून कोणाचे खिसे किती गरम झाले, हे जनतेपासून लपून राहिलेले नाही

सकाळ डिजिटल टीम

राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला शेतीच अतोनात नुकसान झालं आहे. त्यावरून राज्यात राजकारण पेटलं असून आरोप प्रत्यारोप यांच सत्र सुरू झालं आहे. अशातच शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

'सत्तांतरातून राज्यात कोणाचे खिसे किती गरम झाले, हे आता महाराष्ट्रातील जनतेपासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची दिवाळी जोरात झाली असली तरी जनतेचे काय? असा प्रश्न सामनातून सरकारला केला आहे. तर बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस का वाढतेय असे एक ना अनेक प्रश्न जनतेच्या मनात धुमसत आहेत. या फटाक्यांची वात जेव्हा पेटेल तेव्हा सरकारच्या खुर्चीखाली धमाका झाल्याशिवाय राहणार नाही' असं म्हणत सामनातून दिवाळीच्या दिवशी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे.

'राज्यातील महानगरे व मोठय़ा शहरांत दिवाळीचा धुमधडाका जोरात दिसत असला तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ग्रामीण जनता मात्र ऐन दिवाळीत चिंताक्रांत होऊन बसलेली दिसत आहे. लोकांना दैनंदिन जीवनात जे प्रश्न भेडसावताहेत, त्यांचा जनतेला विसर पडला या भ्रमात सरकारने राहू नये. केंद्रातील सत्ताधारी आणि राज्यात सत्तेवर असलेले मिंधे सरकार आश्वासनांची आतषबाजी तर जोरात करीत आहे, पण जनतेच्या जीवनातील अंधार कायमच आहे. ‘अच्छे दिन’ची दिवाळी कुठे हरवली? अर्थव्यवस्थेचे दिवाळे का वाजले? डॉलरच्या धुमधडाक्यात रुपयाचा रोज ‘आपटी बार’ का होतोय? महागाई कमी का होत नाही? गॅस व पेट्रोल-डिझेलचे दर दुपटीने का वाढले? असे सवालच शिवसेनेनं केंद्र आणि शिंदे सरकारला विचारले आहे.

'राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर जे ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे, त्या चिंताक्रांत शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर कसा करता येईल याचा विचार सरकारने करायला हवा. यंदाच्या पावसाळ्याने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना पुरते उद्ध्वस्त केले. लाखो हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. मूग, उडदापासून आता हातातोंडाशी आलेले सोयाबीन व कापसाचे पीकही ढगफुटीसारख्या पावसाने शेतातच सडत पडले. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर अंधार आहे. सत्तांतरातून राज्यात कोणाचे खिसे किती गरम झाले, हे आता महाराष्ट्रातील जनतेपासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची दिवाळी जोरात झाली असली तरी जनतेचे काय? असा प्रश्नही शिवसेनेकेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : ८ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; हरवलेला लेक सापडला, वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

U19 World Cup: ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला! १२ चौकार अन् ५ षटकारांसह झळकावलं विश्वविक्रमी शतक

Pune Crime : पुण्यातील घायवळ टोळीविरोधात साडे सहा हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

Google Enters IPL : मोठी बातमी! 'गुगल'ची आता ‘IPL’मध्ये एन्ट्री होणार; ‘BCCI’ला तब्बल २७००००००००० रुपये मिळणार

Latest Marathi News Live Update: पिण्याच्या पाण्यात सांडपाणी, दुरुस्तीच्या कामासाठी २० कोटी खर्च

SCROLL FOR NEXT