Sachin Sawant vs BJP esakal
महाराष्ट्र बातम्या

PFI वर भाजपा सरकारनं अजून बंदी का घातली नाही? काँग्रेस प्रवक्त्याचा थेट सवाल

आतापर्यंत पीएफआयशी संबंधित 106 लोकांनाही अटक करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

आतापर्यंत पीएफआयशी संबंधित 106 लोकांनाही अटक करण्यात आली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency NIA) देशभरात छापे टाकत आहे. हे छापे पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (Popular Front of India PFI) संबंधित लोक आणि ठिकाणांवर टाकले जात आहेत. एनआयएनं देशातील 15 राज्यांमध्ये छापे टाकले आहेत. आतापर्यंत पीएफआयशी संबंधित 106 लोकांनाही अटक करण्यात आली आहे.

NIA नं आतापर्यंत केरळमधून सर्वाधिक 22 जणांना अटक केली आहे. तर, महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटकातून 20-20 जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय, तामिळनाडूमधून 10, आसाममधून 9, उत्तर प्रदेशमधून 8, आंध्र प्रदेशमधून 5, मध्य प्रदेशातून 4, पुद्दुचेरी आणि दिल्लीतून प्रत्येकी 3 आणि राजस्थानमधून 2 जणांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाई विरोधात शनिवारी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएफआयच्या सदस्यांनी आंदोलनं केली. या आंदोलनाच्या वेळी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Congress leader Sachin Sawant) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.

पीएफआयचा फायदा भाजपलाच होतो आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी ट्विटरवरून केला आहे. पीएफआयवर भाजपा सरकारनं (BJP Government) अजून बंदी का घातली नाही? भाजपाच्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी पुरावे आहेत हे जाहीर केलं होतं. भाजपाशासित पुणे महापालिकेनं (Pune Municipal Corporation) पीएफआयला कोरोना काळात दफनविधीची जबाबदारी का दिली होती? पोलिस ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणाल्याची पुष्टी का करत नाहीत? भाजपालाच पीएफआयचा फायदा होतो”, असं ट्विट सावंतांनी केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT