Politics, Sachin Sawant on Raj Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

'राज ठाकरेंनी भाजपचा 'हा' आदेश जसाच्या तसा मानला वाटतं'

इडीची नोटीस आल्यावर राज ठाकरे यांना हनुमान चालीसा आठवली हे स्पष्ट मात्र..

सकाळ डिजिटल टीम

इडीची नोटीस आल्यावर राज ठाकरे यांना हनुमान चालीसा आठवली हे स्पष्ट मात्र..

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्या निमित्त शिवतीर्थावर केलेल्या भाषणात महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यांचे पडसाद राजकीय पटलावर उमटत आहेत. या भाषणात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढा नाहीतर आम्ही भोंग्यांविरोधात दुप्पट लाउडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाचू असा इशारा दिला होता. यानंतर काल घाटकोपर येथील मनसे कार्यालयात मशिदी समोर भोंग्यावर (स्पिकरवर) हनुमान चालीसा वाजवली गेली. त्यामुळे मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. कॉंग्रेसचे सचिव सावंत यांनीही ट्विट करत राज ठाकरेंना टोमणा मारला आहे.

सचिन सावंत ट्विटमध्ये म्हणतात, इडीची नोटीस आल्यावर राज ठाकरे यांना हनुमान चालीसा आठवली हे स्पष्ट आहे. पण हनुमान चालीसा का? "भीमरुपी महारुद्रा" मारुती स्तोत्र का नको ? भाजपाचा आदेश जसाच्या तसा मानला वाटतं असे म्हणत त्यांनी राज ठाकरे आणि मनसेला टोला लगावला आहे.

दरम्यान, शिवतीर्थावरील भाषणात मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. याला अनेकदा विरोध झाला आहे. पहाटे पाच वजतापासून भोंगे वाजत असल्याने झोप होत नाही. परीक्षेच्या काळात मुलांचा अभ्यास होत नाही. असे अनेक कारणं पुढे करत भोंग्यापासून सुटका मिळावी अशी मागणी होत असल्याचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. यानंतर हे भोंगे काढण्यात यावेत यासाठी त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता. यानंतर काल मुंबईतील मनसेच्या काही कार्यालयात लाऊड स्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवण्यात आली होती. आता सचिन सावंत यांनीही या वादात उडी घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ऑगस्टचा हप्ता 'या' तारखेपासून खात्यात जमा होणार?

“लग्न करण्याची इच्छा…” प्राजक्ता माळी 'लग्नपंचमी' नाटक पाहिल्यानंतर म्हणाली...'आज कळलं की...'

Pimpri Chinchwad Accident news : भरधाव डंपरच्या धडकेत तरुण वकील साक्षी चौभेचा मृत्यू, पिंपरीत हळहळ

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT