political esakal
महाराष्ट्र बातम्या

..तर सोमय्यांसोबत भाजपही देशद्रोही, कॉंग्रेसची चौकशीची मागणी

आता सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी किरीटी सोमय्यांना धारेवर धरलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

अलिकडील काही दिवसांत राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. विरोधकांकडून सातत्याने शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. दरम्यान, आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचलेच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी किरीटी सोमय्यांना धारेवर धरलं आहे. दरम्यान, आता कॉंग्रसेच्या सचिन सावंत यांनी ट्विट करत सोमय्या यांच्यावर निशाणा साधाला आहे.

ट्विटमध्ये सचिन सावंत म्हणतात, सोमय्यांनी जर आयएनएस विक्रांतच्या पुनरुज्जीवनाकरिता जमा केलेले पैसे भाजपाला दिले असतील तर दोन मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. एक म्हणजे, असे पैसे जमा करणे बेकायदेशीर आहे. दुसरा म्हणजे सोमय्यांबरोबर भाजपही देशद्रोही पक्ष आहे हे सिद्ध होते. या अगोदर टेरर फंडींगच्या आरोपी कंपनीकडून भाजपाने देणगी घेतली आहे. भाजपाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.

दरम्यान, याप्रकरणी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून हा घोटाळा समोर आला आहे. हा देशद्रोहीपणा असून याचा तपास केंद्रीय संस्थांनी करावा असे आव्हानही खासदार राऊत यांनी केलं आहे. सोमय्या हे सीए असल्यामुळे असा पैसा कसा पचवायचे याची त्यांनी माहिती असल्याचेही राऊत यांनी म्हटले होते. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती. आता सावंतांच्या ट्विटनंतर पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT